Hapus Mango : सततच्या ढगाळ वातावरणामुळे थंडीवर परिणाम झाल्याने यंदा कोकणातील हापूस आंब्याचे उत्पादन थोडे उशिरा सुरू झाले. हळूहळू ढगाळ वातावरण निवळल्यानंतर आता आवक वाढलेली असली तरी हापूस आंब्याचे दर चढेच आहेत. विशेषतः मुंबईत आणि सांगलीत हापूस आंब्याला 400 ते 650 रूपये प्रति किलोचा दर मिळाला आहे. तुलनेत लोकल आंब्याला 60 ते 120 रूपये प्रति किलोचा दर सध्या मिळत आहे.
महाराष्ट्र् राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी (ता. 15) मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हापूस आंब्याची सुमारे 410 क्विंटल आणि लोकल आंब्याची फक्त 20 क्विंटल आवक झाली होती. पैकी हापूस आंब्याला 40000 ते 65000 रूपये, सरासरी 52500 रूपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. तर लोकल आंब्याला 6000 ते 12000, सरासरी 9000 रूपये प्रति क्विंटल दर मिळाला. सांगली येथील बाजार समितीमध्ये हापूस आंब्याची जेमतेम 04 क्विंटल आवक झाली, त्यास 40000 ते 65000 रूपये प्रति क्विंटल दर मिळाला.
15 फेब्रू : हापूस आंब्याचे दर (रूपये/प्रति क्विंटल)
✅ मुंबई- 40000 ते 65000, सरासरी 52500
✅ सांगली- 40000 ते 65000, सरासरी 52500
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)