भारतासाठी चिंतेचा विषय, 2023 हे सव्वाशे वर्षातले दुसरे सर्वात उष्ण वर्ष

गावशिवार न्यूज | भारत देशासाठी सन 2023 हे गेल्या 123 वर्षातील दुसरे सर्वात उष्ण वर्ष ठरल्याची धक्कादायक माहिती हवामान विभागाने दिली आहे. गेल्यावर्षी सरासरीपेक्षा 65 शतांश सेल्सियस अधिक तापमानाची नोंद भारत देशात झाली. ग्लोबल वार्मिंगमुळे देशातील तापमानात अलिकडे झपाट्याने वाढ होत असल्याचे त्यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. (Hot Year 2023)

भारतात सन 2016 मध्ये देखील सरासरीपेक्षा 71 शतांश सेल्सियस अधिक तापमानाची नोंद झाली होती. हवामान विभागाने सन 1901 वर्षापासून ठेवलेल्या नोंदीनुसार सदरची वाढ समोर आली आहे. गेल्या वर्षी विशेषतः ऑगस्ट, सप्टेंबर आणि नोव्हेंबर हे महिने सरासरीपेक्षा अधिक तापमान नोंदवण्यात गेल्या 123 वर्षातले सर्वात उष्ण महिने ठरले. या कालावधीत सरासरीपेक्षा सुमारे 1 अंश सेल्सियस अधिक तापमानाची नोंद घेण्यात झाली. पर्यावरण रक्षणासाठीच्या उपापयोजनांवर मोठ्या प्रमाणावर भर देण्याची त्यामुळे गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, निसर्गाचा समतोल बिघडल्याने गेल्या वर्षभरात हिंदी महासागरात आतापर्यंत सहा चक्रीवादळे निर्माण झाली असून, त्यामुळे मोठी हानी देखील झाली आहे. विशेषतः मिचौंग चक्रीवादळाने गेल्या महिन्यात दक्षिण भारतात हाहाकार माजवला होता.

WhatsApp Group
Previous articleउद्योजिका कमलताई परदेशी यांच्या निधनाने गाव खेड्यातील महिलांचा आधारवड कोसळला
Next articleआदिवासी तरूणाने झोपडीत यशस्वी करून दाखवली मशरूमची शेती