Indian Railways : इगतपुरी-भुसावळ-बडनेरा सेक्शनमध्ये 12 रेल्वे गाड्यांचा वेग आता 130 किलोमीटर प्रतितास

Indian Railways : इगतपुरी-भुसावळ-बडनेरा या सेक्शनमध्ये धावणाऱ्या 12 प्रवासी रेल्वेगाड्यांचा वेग आता 130 किलोमीटर प्रतितास इतका करण्यात आला आहे. मध्य रेल्वेने पायाभूत सुविधांमध्ये केलेल्या अनेक चांगल्या सुधारणांमुळे जलदगतीने रेल्वे गाड्या चालविणे खूपच सोपे झाले आहे.

The speed of 12 trains in the Igatpuri-Bhusawal-Badnera section is now 130 kmph.

प्रवाशांची सोय वाढविण्याच्या उद्देशावर कायम असलेल्या मध्य रेल्वेने लांब पल्ल्याच्या बऱ्याच गाड्यांचा वेग वाढविण्यावर सुद्धा आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यामाध्यमातून विविध विभागात अनेक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्या जात आहेत. ज्यात मल्टिट्रॅकिंग, ओव्हर हेड इक्विपमेंट ऍडजस्टमेंट, सिग्नलिंग सुधारणा आणि इतर बऱ्याच तांत्रिक सुधारणांचा समावेश आहे. या पायाभूत सुधारणांमुळे मध्य रेल्वे आता ठराविक विभागात 130 किलोमीटर प्रतितास वेगाने प्रवासी गाड्या चालविण्यास सक्षम बनली आहे. प्राप्त माहितीनुसार सध्या 12 रेल्वे गाड्या इगतपुरी ते भुसावळ (अंतर 308.12 किमी) आणि भुसावळ ते बडनेरा (अंतर 218.53 किमी) या एकूण 526.65 किलोमीटर अंतरात वाढीव वेगाने मार्गक्रमण करत आहेत. त्यात (12111) छत्रपती शिवाजी टर्मिनस- अमरावती एक्सप्रेस, (12112) अमरावती-छत्रपती शिवाजी टर्मिनस एक्सप्रेस, (12290) नागपूर-छत्रपती शिवाजी टर्मिनस एक्सप्रेस, (12289) छत्रपती शिवाजी टर्मिनस-नागपूर एक्सप्रेस, (12860) हावडा-छत्रपती शिवाजी टर्मिनस एक्सप्रेस, (12859) छत्रपती शिवाजी टर्मिनस- हावडा एक्सप्रेस, (12106) गोंदिया-छत्रपती शिवाजी टर्मिनस, (12105) छत्रपती शिवाजी टर्मिनस-गोंदिया एक्सप्रेस, (12810) हावडा-छत्रपती शिवाजी टर्मिनस, (12809) छत्रपती शिवाजी टर्मिनस-हावडा एक्सप्रेस, (22221) छत्रपती शिवाजी टर्मिनस- हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस, (22222) हजरत निजामुद्दीन-छत्रपती शिवाजी टर्मिनस राजधान एक्सप्रेस या गाड्यांचा त्यात समावेश आहे.

या मार्गावर रेल्वे गाड्यांच्या गतीत वाढ

सर्वसमावेश सुरक्षा तपासणी व संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या तांत्रिक तपासणीनंतर 12 रेल्वे गाड्यांचा वेग वाढविण्यात आला आहे. रेल्वेची प्रगती प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी आणि रेल्वेच्या वेळापत्रकाची एकूण वक्तशीरता वाढविण्यासाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे. सद्यःस्थितीत मध्य रेल्वे सुमारे 1111.29 किलोमीटरच्या एकत्रित अंतरात 130 किलोमीटर प्रतितास वेगाने गाड्या चालवित आहे. त्यापैकी इगतपुरी-भुसावळ-बडनेरा मार्गावर साधारण 526.65 किलोमीटर, पुणे-दौंड मार्गावर 75.59 किलोमीटर आणि इटारसी-नागपूर-वर्धा-बल्लारशा विभागात 509 किलोमीटर अंतरात 130 च्या वेगाने रेल्वे गाड्या धावू लागल्या आहेत.

WhatsApp Group
Previous articleBanana Rate : आज शुक्रवारी (ता. 17 नोव्हेंबर) असे असतील केळीचे भाव
Next articleSoyabean Market : राज्यात सोयाबीनला बहुतांश ठिकाणी आधारभूत किंमतीपेक्षा जास्त मिळतोय बाजारभाव