दुबईतील ‘कॉप 28’ परिषदेत जळगावच्या जैन इरिगेशनचा सहभाग

Jain Irrigation : संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई येथे एक्स्पो सिटीत युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज (UNFCCC)अंतर्गत 200 देशातील सदस्यांचा सहभाग असलेल्या ‘कॉप 28’ परिषदेचे 28 वे सत्र नुकतेच पार पडले. त्यात जळगावच्या जैन इरिगेशनलाही सहभागी होण्याची संधी मिळाली. जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष अनिल जैन आणि अभेद्य जैन त्याठिकाणी उपस्थित होते.

Participation of Jain Irrigation of Jalgaon in ‘COP 28’ conference in Dubai

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील दुबईतील ‘कॉप 28’ परिषदेला उपस्थित होते. शेती आणि क्लाइमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग याबाबत भारताच्या वतीने चर्चासत्रात सहभागी होऊन मत मांडण्याची संधी अनिल जैन यांना प्राप्त झाली. यंदाच्या 28 व्या परिषदेला जगभरातील मान्यवर उपस्थित होते. या परिषदांचे आयोजन प्रामुख्याने संयुक्त राष्ट्र संघामार्फत केले जाते. हवामान बदलाशी लढा देण्यासाठी प्रभावी मार्गांचे मूल्यांकन करणे आणि युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन क्लायमेट चेंज (यूएनएफसीसी) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हवामान कृतीची योजना आखली जाते. 1995 मध्ये बर्लिन येथे पहिल्या ‘कॉप’ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. गतवर्षीची ‘कॉप 27’ परिषद इजिप्तमध्ये पार पडली होती.

जैन इरिगेशनचा अल्पभूधारक शेतकऱ्यांना आधार
बदलत्या पर्यावरणातील समस्या अतिशय चिंताजनक असून येणाऱ्या काही वर्षानंतर पृथ्वीवरील तापमान प्रचंड वाढेल, करोडो वर्षांपूर्वी डायनोसरसारखे प्राणी नामशेष झाले त्याप्रमाणे मानवाचेही अस्तित्व संपेल का हा गंभीर प्रश्न अनेक शास्त्रज्ञांपुढे निर्माण झाला आहे. ऑईल आणि गॅसचा कमी वापर करून वातावरण शुद्ध राखण्यासाठी काय करता येईल? या संदर्भातील सोल्यूशन या परिषदेत गेल्या 28 वर्षापासून शोधण्याचा प्रयत्न केला जातो आहे. पाण्याची सुरक्षितता आणि शाश्वतता हा सुद्धा परिषदेतील महत्त्वाचा विषय होता. अन्नसुरक्षा आणि अपारंपारिक ऊर्जा याविषयातही परिषदेत चर्चा झाली. सोशल प्राेटेक्शन आणि क्लाइमेट चेंजच्या परिसंवादात मनोगत व्यक्त करताना अनिल जैन यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या सक्रिय सहभागासाठी जैन इरिगेशन त्यांना तंत्रज्ञान, मार्गदर्शन व प्रोत्साहन देते. अल्पभूधारक शेतकरी हे त्यांनी पिकवलेल्या अन्नधान्यातून सगळ्या समाजाला उपकृत करण्याची महत्त्वाची कामगिरी करत असतात. या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी व त्यांचे सशक्तीकरण करण्यासाठी विविध सामाजिक सुरक्षा उपाय जैन इरिगेशनकडून राबविले जातात. ज्यात माहिती तंत्रज्ञानाचा वापर, ज्ञान, आणि सामाजिक प्रतिष्ठा हे घटक अंतर्भूत आहेत.

WhatsApp Group
Previous articleजळगाव जिल्ह्यातील दुष्काळी भागाची केंद्रीय पथकाकडून गुरुवारी पाहणी
Next articleउद्या शुक्रवारी (ता.15 डिसेंबर) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव