जळगावच्या लालबहादूर शास्त्री टॉवरवर जैन इरिगेशनतर्फे प्रभू श्रीरामांचे विराट दर्शन

गावशिवार न्यूज | अयोध्याला होत असलेल्या प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण भारतात आनंदोत्सव साजरा होत आहे. यापार्श्वभूमीवर भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीतर्फे जळगाव शहरातील चार चौक व तीन उद्यानांमध्ये प्रभु श्रीरामांचे प्रतिमांसह आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विशेषतः लालबहाद्दुर शास्त्री टॉवरवर उभारलेल्या 80 फूट उंच प्रतिमेमुळे प्रभु श्रीरामांचे विराट दर्शन नागरिकांना होत आहे. (Jain Irrigation)

प्रभू श्रीरामचंद्र यांच्याविषयी विशेष सजावट लालबहाद्दुर शास्त्री टॉवर, स्वातंत्र चौक, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक येथे करण्यात आली आहे. यासह भाऊंचे उद्यान, महात्मा गांधी उद्यान, गौराई उद्यान याठिकाणी आकर्षक सजावट व रोषणाई केली आहे. यातून जळगावकरांना दिवाळीची अनुभूती येत आहे.
श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त प्रभू श्रीरामांची भव्य अशी 80 फुट उंचीची प्रतिमा जळगाव शहराच्या मध्यभागी असलेल्या लालबहाद्दुर शास्त्री टॉवरवर साकारली आहे. ही प्रतिमा कान्हदेशातील सर्वात मोठी प्रतिमा असून, यानंतर स्वातंत्र्य चौकात 30 फुट तर आकाशवाणी चौकात 40 फुटांची प्रतिमा उभी करण्यात आली आहे. या प्रतिमेतून प्रभू श्रीरामाचे विराट दर्शन नागरिकांना होत आहे. याशिवाय जैन इरिगेशनतर्फे जळगाव शहरातील जवळपास 51 मंदिरांमध्ये केळी वाटप केली जाणार आहे. प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना केळी प्रसाद उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासाठी शिवराज्याभिषेक लोकोत्सव समिती महाबळ उपनगर यांचे सहकार्य असेल.

जैन इरिगेशनच्या 13 हजाराहून अधिक सहकाऱ्यांना होणार पेढे वाटप
प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडच्या 13 हजारहून अधिक सहकाऱ्यांना पेढे वाटप केले जातील. प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेनिमित्त कांताई सभागृह येथे वाटप होणाऱ्या ‘स्नेहाच्या शिदोरी’ सोबत ड्रायफूट शिरा दिला जाईल. श्रीराम मंदीर परिसरात प्राणप्रतिष्ठा सोहळा हा सात अधिवासांमध्ये होत आहे. देशातील जवळपास 125 परंपरांचे संत-महापुरूष व भारतातील सर्व शाखीय 2500 श्रेष्ठ पुरूषांची उपस्थिती असेल. या सोहळ्यासाठी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन हेही निमंत्रीत असून ते आज अयोध्याला उपस्थितीत राहून प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील 50 लाख भाविकांचे प्रतिनिधित्व करतील.

WhatsApp Group
Previous articleविदर्भासह मध्य महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता
Next articleअयोध्येत पंतप्रधानांच्या हस्ते श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न