जळगाव शहरातील पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाचे रविवारी होणार लोकार्पण

Jalgaon Breaking News : जळगाव शहरात ‘महारेल’ने निर्माण केलेल्या पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण देशाचे केंद्रिय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी तसेच राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते रविवारी (ता.17 डिसेंबर) दुरदृश्य प्रणालीद्वारे नागपूर येथून होणार आहे. उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, ना.अजित पवार यांच्यासह जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आदी यावेळी उपस्थित राहतील.

Pimprala railway flyover in Jalgaon city will be inaugurated on Sunday

पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम वेगाने पूर्ण व्हावे म्हणून भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जळगावचे उपविभागीय अधिकारी महेश सुधाळकर व त्यांच्या टीमने खूप परिश्रम घेतले. MGNF फेलो दुशांत बांबोळे यांनीही समन्वय साधला. या उड्डाणपुलामुळे जळगाव शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल, अशी आशा बाळगली जात आहे. रिंगरोडपासून सुरू झालेला हा उड्डाणपूल थेट कानळदा रस्त्याला जोडला जाणार आहे. त्यामुळे जळगावकरांना कोणत्याही विलंबाशिवाय आता थेट शिवाजीनगर भागात तसेच प्रस्तावित राज्यमार्गावरून थेट चोपडा तालुक्याकडे मार्गस्थ होता येणार आहे. याशिवाय उड्डाणपुलाचा एक आर्म पिंप्राळा उपनगराकडे वळविण्यात आलेला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षांपासून रेल्वेगेटमुळे होणारी वाहतुकीची कोंडीची समस्या देखील आता कायमस्वरूपी दूर होणार आहे.

12 सप्टेंबर 2022 रोजी बंद झाले होते रेल्वेचे पिंप्राळाकडे जाणारे गेट

जळगाव शहरातील काही प्रमुख ऐतिहासिक स्थळांमध्ये समावेश असलेले रेल्वेचे पिंप्राळा उपनगराकडे जाणारे रेल्वेगेट एक होते. मध्य रेल्वेच्या भुसावळ- मनमाड-मुंबई या अतिशय वर्दळीच्या मार्गावरील या रेल्वेगेटने तब्बल 62 वर्ष जळगावकरांची वाट सुकर केली. पूर्वीच्या काळी मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या तशी मर्यादितच होती. मात्र, कालांतराने मनमाड-मुंबई मार्गावरील रेल्वे गाड्यांची वर्दळ वाढली आणि पिंप्राळा रेल्वेगेट दिवसातून अनेक वेळा बंद राहू लागले. परिणामी, रेल्वेगेट ओलांडून पलिकडे जाणाऱ्या शहरातील वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यातून मात्र काढण्यासाठी शेवटी रेल्वेने उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला. ‘महारेल’कडे त्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

WhatsApp Group
Previous articleउद्या शनिवारी (ता.16 डिसेंबर) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव
Next articleविदर्भातील ‘या’ जिल्ह्यात आणखी दुसरा टेक्सटाईल पार्क उभा राहणार