Jalgaon Crime News : सुटीच्या दिवशी पाच लाखांची लाच घेणारे दोन्ही अधिकारी अडकले जाळ्यात

Jalgaon Crime News : विरोधात सुरू असलेल्या चौकशीत मनाजोगता अहवाल देण्याच्या बोलीवर समोरच्या लोकसेवकाकडून सुमारे 5 लाख रूपयांची लाच स्वीकारताना येथील पंचायत समितीच्या दोन अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याप्रकरणी जळगावच्या जिल्हा पेठ पोलिसात दोघांविरूद्ध गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे.

Both officials who took bribe of 5 lakhs on holiday are in the net

दिवाळी पाडव्याची सुटी असल्याने बहुतांश सर्व शासकीय कार्यालयांमध्ये स्मशान शांतता पसरलेली असताना, पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी रवींद्र शालिग्राम सपकाळे तसेच विस्तार अधिकारी पद्माकर बुधो अहिरे यांनी जामनेर तालुक्यातील एका लोकसेवकाला पैसे देण्यासाठी बोलावून घेतले होते. चौकशी समितीचे जबाबदार पदाधिकारी म्हणून आम्ही तुम्हाला पाहिजे तसा अनुकूल अहवाल तयार करून देतो, असे सांगून त्यांनी समोरच्या लोकसेवकाकडून आधीच 5 लाख रूपयांची मागणी केली होती. ठरल्यानुसार संबंधित लोकसेवक पंचायत समितीच्या आवारात येताच दोन्ही अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. कारण, लोकसेवकाने त्यासंदर्भात रितसर तक्रार नोंदवून ठेवली होती. लाच स्वीकारल्याची खात्री पटताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या पथकातील निरीक्षक अमोल वालझाडे, ए.एन.जाधव, बाळू मराठे, सुनील वानखेडे, राकेश दुसाने, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, प्रदिप पोळ यांनी दोघांवर झडप घातली. दरम्यान, घडल्या प्रकाराची माहिती मिळताच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.

WhatsApp Group
Previous articleBanana Rate : उद्या बुधवारी (ता. 15 नोव्हेंबर) असे असतील केळीचे भाव
Next articleJalgaon Crime News : वावडदा शिवारातील शेताची राखणदारी करणाऱ्या मजुराचा निर्घूण खून