Jalgaon Drought News: जळगाव जिल्ह्यात 14 तालुक्यांच्या 67 महसूली मंडळात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर

Jalgaon Drought News: जळगाव जिल्ह्यात 14 तालुक्यातील 67 महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. संबंधित दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार आहेत, अशी माहिती मदत, पुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे. चाळीसगाव तालुका आधीच पूर्णपणे दुष्काळी घोषित झालेला असल्याने आताच्या दुष्काळसदृश्य तालुक्यांच्या यादीत त्याचा समावेश करण्यात आलेला नाही.

Drought-like situation announced in 67 revenue boards of 14 talukas in Jalgaon district

मंत्रालयातील वॉर रूम येथे गुरुवारी (ता.09) मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत दुष्काळसदृश्य महसूल मंडळे निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला मंत्रीमंडळ उपसमितीचे सदस्य सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, कृषीमंत्री धनंजय मुंडे, रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, कृषी विभागाचे सचिव सुनिल चव्हाण, वित्त विभागाचे सहसचिव वि.र.दहिफळे, पाणीपुरवठा विभागाच्या उपसचिव वर्षा देशमुख, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव संजय धारूरकर, जलसपंदा विभागाचे सहसचिव संजय टाटू उपस्थित होते. सध्या 67 महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. परिस्थिती लक्षात घेऊन आगामी कालावधीतही दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेवून उर्वरीत भागासाठी निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी स्पष्ट केले.

दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर झालेली महसूल मंडळे

● जळगाव तालुका : जळगाव, भोकर, म्हसावद, नशिराबाद, असोदा, पिंप्राळा
● जामनेर तालुका : जामनेर, पहुर, शेंदुर्णी, वाकडी, मालदाभाडी, नेरी, तोंडापूर
● एंरडोल तालुका : एरंडोल, उमरदे (रिंगणगाव), कासोदा, उत्राण
● धरणगाव तालुका : धरणगाव, सोनवद, पाळधी, पिंप्री खुर्द, साळवा, चांदसर
● भुसावळ तालुका : भुसावळ, वरणगाव, कुऱ्हे, पिंपळगाव
● बोदवड तालुका : बोदवड, करंजी
● यावल तालुका : भालोद, किनगाव, साकळी, फैजपूर, बामणोद
● रावेर तालुका : खिर्डी, निंभोरा बुद्रुक
● मुक्ताईनगर तालुका : मुक्ताईनगर,अंतुर्ली, घोडसगाव
● पाचोरा तालुका : पाचोरा, नगरदेवळा, गाळण, पिंपळगाव हरेश्वर, कुऱ्हाड, वरखेड बुद्रूक
● भडगाव तालुका : भडगांव, कजगाव (गोंडगाव), आमडदे, कोळगाव
● अमळनेर तालुका : अमळनेर, पातोंडा, भरवस, मारवड, अमळगाव, शिरूड, वावडे
● चोपडा तालुका : चोपडा, अडावद, गोरगावले बु, चहार्डी, धानोरा प्र.य., लासूर
● पारोळा तालुका : बहादरपुर, चोरवड, शेवाळे बुद्रुक

WhatsApp Group
Previous articleSuccess Story: कलिंगडाच्या वाया गेलेल्या पिकात जादुची कांडी फिरली….शेतकरी 65 दिवसातच बनला ‘लखपती’
Next articleराज्यातील कोणत्या बाजार समितीत मिळाला ? तुरीला 11,800 रूपये प्रतिक्विंटल भाव