Jalgaon Polytics : भाजप नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याबद्दल अपशब्द वापरला म्हणून आज शुक्रवारी (ता.24) जळगाव शहरातील शास्त्री टॉवर चौकात भाजपच्या महिला आघाडीने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या प्रतिमेला चपलांचा मार दिला. प्रसंगी खडसेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सु्द्धा करण्यात आली.
जळगाव जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा श्रीमती स्मिता वाघ यांच्यासह जळगावच्या माजी महापौर सीमा भोळे व अन्य बऱ्याच महिलांनी एकनाथ खडसेंच्या प्रतिमेला चपला मारल्या. यावेळी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, भाजप महानगराध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी, अमोल शिंदे आदींसह बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.
In Jalgaon Eknath Khadse’s image was hit with shoes by BJP women
दोन दिवसांपूर्वी जळगाव शहरात प्रसारमाध्यमांसमोर बोलताना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी थेट एकनाथ खडसेंच्या आजारपणावरच बोट ठेवले होते. कोर्टाकडून सुमारे 137 कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस आल्यावर ढोंगे करायची, काही झालेले नसताना दवाखान्यात जाऊन बसायचे, पुन्हा स्टेटमेंट द्यायला तयार व्हायचे, माझी तब्येत खराब आहे म्हणत मुख्यमंत्र्यांकडून विमान मागवायचे. त्यांना कोणता अटॅक आला आहे, कोर्टाची थोडीशी सहानुभूती मिळविण्यासाठी त्यांनी सगळी नाटके केली आहेत. आमचे सरकार आमचे नेते सगळे सांभाळण्यास तयार आहेत. तुम्ही तुमच्या तब्बेतीची काळजी घ्या, असा टोलाही मंत्री महाजन यांनी खडसेंना मारला होता. दरम्यान, गिरीश महाजनांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना एकनाथ खडसे यांनी म्हटले होते की, गिरीश महाजनांनी माझा आजार खोटा आहे किंवा फक्त सहानुभूती मिळविण्यासाठी मी ढोंग केले आहे ते तपासून घ्यावे. तसे नसेल तर त्यांनी मला भरचौकात जोडे मारावे किंवा मी तुम्हाला भरचौकात जोडे मारेल, असे म्हटले होते. त्याचप्रमाणे वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना महाजनांनी नाही ते चाळे केल्यामुळे त्यांचे मंत्रिपद काढून घेतले होते, असाही गौप्यस्फोट देखील खडसेंनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला होता. त्यांच्या त्या वक्तव्याचा तीव्र निषेध भाजप महिला आघाडीतर्फे करण्यात आला.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)