जळगाव जिल्हा परिषदेकडून एकाच दिवशी 20 कोटींच्या कामाचे कार्यारंभ आदेश

गावशिवार न्यूज | जळगाव जिल्हा परिषद अंतर्गत तीर्थक्षेत्र विकास, प्रादेशिक पर्यटन,‌ नवीन शाळा खोली बांधकामे यासह विविध विकास कामे करण्यासाठी मंगळवारी (ता.02) एकाच दिवशी तब्बल 38 कामांचे 19‌ कोटी 94 लाख रुपयांचे कार्यारंभ आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

Jalgaon ZP News

नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी गेल्या आठवड्यात जिल्हा परिषदेची बैठक घेतली होती. त्यात त्यांनी जिल्हा नियोजनाच्या कामांना गती देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकीत यांनी तात्काळ कार्यारंभ आदेश निर्गमित केले आहेत‌. एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यारंभ आदेश निर्गमित झाल्याने मंजूर विकास कामांना चालना मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांसाठी मंजूर करण्यात आलेल्या 19 कोटी 94 लाख रुपयांच्या तब्बल 38 कामांना विविध विभागांमार्फत देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यताना बांधकाम विभागामार्फत कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.

यामध्ये विविध विकास कामांसोबतच जिल्हा परिषद अंतर्गत तीर्थक्षेत्र विकास, प्रादेशिक पर्यटन, जिल्ह्यात नवीन शाळा खोली बांधकामे होणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांच्या आदेशान्वये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, मुख्या लेखा वित्त अधिकारी बाबुलाल पाटील, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी यासाठी परिश्रम घेतले.

असे आहे कार्यारंभ आदेश दिलेल्या कामांचे एकूण स्वरूप

जळगाव जिल्हा परिषदेकडून 7 कामांसाठी 2 कोटी 94 लाख 11 हजार 678 रुपये, 11 कामांसाठी 8 कोटी 36 लाख 53 हजार 726 रुपये, तसेच 12 कामांसाठी 5 कोटी 85 लाख 77 हजार 434 रुपये, 4 कामांसाठी 1 कोटी 67 लाख 4 हजार 624 रुपये, 2 कामांसाठी 49 लाख 59 हजार 412 रुपये, तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत 18 लाख 83 हजार 255 रुपये, प्रादेशिक पर्यटन अंतर्गत29 लाख 75 हजार 955 रुपये, तर नवीन शाळा खोली बांधकामासाठी 11 लाख 97 हजार 645 रुपये, अशा 19 कोटी 94 लाखांच्या कामांचे कार्यारंभ आदेश निर्गमित करण्यात आले.

WhatsApp Group
Previous articleबुधवारी (03 जानेवारी) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव
Next articleजळगाव जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत होणार, अनावश्यक साठा न करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन