शेतकऱ्यांनो लक्ष द्या, प्रधानमंत्री कुसुम सौर योजनेच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक

गावशिवार न्यूज | प्रधानमंत्री कुसुम सौर योजनेंतर्गत सौर पंपासाठी अर्ज करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना मोबाईलवर फसवे संदेश पाठवले जात आहेत. त्याद्वारे शेतकऱ्यांची घोर फसवणूक होण्याची शक्यता असून तशा संदेशापासून सावध राहावे, असे आवाहन राज्याच्या महाऊर्जा विभागाच्या अपर महासंचालकांनी केले आहे.

Fraud can happen in the name of Pradhan Mantri Kusum Solar Scheme

भारनियमनात दिवसा शेतातील पिकांचे सिंचन करणे शक्य व्हावे यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी पारेषण विरहित सौर कृषी पंप अनुदान तत्वावर उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत 3, 5 आणि 7.5 अश्वशक्ती क्षमतेचे सौर कृषी पंप 90 ते 95 टक्के अनुदानावर उपलब्ध झाले आहेत. सौर कृषी पंपांसाठी पंप क्षमतेनुसार खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यास 10 टक्के आणि अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यास 05 टक्के लाभार्थी हिस्सा भारण्यासाठीचा SMS पाठविला जातो. राज्य शासनाने या योजनेसाठी महाऊर्जास 104823 सौर कृषिपंपांसाठी मान्यता दिली. सदर मान्यतेनुसार महाऊर्जमार्फत लोकसंख्येनुसार जिल्हानिहाय उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. महाऊर्जामार्फत सद्यःस्थितीत सुमारे 75778 सौर कृषीपंप आस्थापित करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी खोटा एसएमएस प्राप्त झाला असेल तर अशा एसएमएसपासून व त्यामुळे होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहावे, असे आवाहन महाऊर्जेद्वारे करण्यात आले आहे.

महाऊर्जाने योजना राबविण्यासाठी https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B हे स्वतंत्र ऑनलाईन पोर्टल विकसित केले आहे. शेतकऱ्यांना सदर योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरु ठेवण्यात आले आहे. ऑनलाईन पोर्टलद्वारे शेतकऱ्यांकडून अर्ज करण्यापासून कागदपत्रे अपलोड करणे, अर्जाची छाननी करणे, शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी संदेश (एसएमएस) पाठविणे, लाभार्थी हिस्सा ऑनलाईन भरण्याची व पुरवठादार निवडण्याची शेतकऱ्यांना मुभा देण्यात आली आहे, अशी माहिती ज‍िल्हा व्यवस्थापक श‍िवाजी बोडके यांनी द‍िली.

WhatsApp Group
Previous articleकोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी 4 ते 7 जानेवारी दरम्यान पावसाची शक्यता
Next articleशासनाचा मोठा निर्णय ! अवकाळी पाऊस व गारपिटीच्या नुकसान भरपाईत ‘इतक्या’ रुपयांची वाढ