मुंबईत यंदा 26 डिसेंबरपासून ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनाची पर्वणी

Mahalaxmi Saras Exibition : गेल्या दीड दशकात राज्यातील सुमारे 8 हजार महिला बचतगटांना सक्षम बनविणारे महालक्ष्मी सरस हे प्रदर्शन मुंबईतील वांद्रे येथे एमएमआरडीए मैदानावर यंदा 26 डिसेंबरपासून सुरू होत आहे. दोन आठवड्यांच्या या प्रदर्शानाला नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

‘Mahalakshmi Saras’ exhibition will be celebrated in Mumbai from December 26 this year

महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तू तसेच स्वादिष्ट पदार्थांना शहरी भागातील ग्राहक उपलब्ध करून देण्यात महालक्ष्मी सरस प्रदर्शनाने नेहमीच मोलाची भूमिका बजावली आहे. यामुळे ग्रामीण भागातील संस्कृती जवळून अनुभवण्याची मोठी संधी शहरातील नागरिकांना महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर मिळते. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आयोजित केले जाणारे महालक्ष्मी सरस हे प्रदर्शन यंदा 26 डिसेंबरपासून 08 जानेवारी दरम्यानच्या कालावधीत आयोजित केले आहे. या प्रदर्शनात महिला बचतगटांनी तयार केलेल्या भरतकामाच्या साड्या, बांबुच्या वस्तू, ज्यूटच्या वस्तू, लाकडी वस्तू, चामड्याच्या वस्तू, कृत्रिम दागिने, लेडीज बॅग, ड्रेस मटेरिअल, चादरी, कार्पेट तसेच पडदे यांचा समावेश असेल. प्रदर्शनात घरगुती मसाले, पापड, कुरड्या आणि बऱ्याच खाद्य पदार्थांची दालने असतील.

‘महालक्ष्मी सरस’मध्ये खाद्य पदार्थांची रेलचेल
मुंबईतील महालक्ष्मी सरस प्रदर्शानात जळगावचे भरीत तसेच कोकणातील मासे आणि तांदळाच्या भाकरी, कोल्हापुरचा तांबडा व पांढरा रस्सा, सोलापुरची शेंगदाणा चटणी हे सर्व पदार्थ खवैय्यांसाठी खास आकर्षण ठरणार आहेत. याशिवाय राज्याच्या विविध भागातील महिलांनी मोठ्या मेहनतीने तयार केलेले मसाले, हातसडीचे तांदूळ प्रदर्शनात असतील. अधिकाधिक नागरिकांनी प्रदर्शनास भेट देऊन बचतगटाच्या महिलांना प्रोत्साहन द्यावे, असेही ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

WhatsApp Group
Previous articleउद्या शुक्रवारी (ता. 22 डिसेंबर) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव
Next articleशेतकऱ्यांमध्ये हायटेक शेतीचा आत्मविश्वास वाढविणारा जैन हिल्स कृषी महोत्सव : रविशंकर चलवदे