Maize market : खरिपात मोठ्या प्रमाणात लागवडीखालील क्षेत्र असणाऱ्या मका पिकाची काढणी अद्याप वेगाने सुरु झालेली नाही. दरम्यान, ठिकठिकाणच्या बाजार समित्यांमध्ये सध्या मक्याची तुरळक आवक सुरु आहे. त्यास 1400 ते 2700 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला आहे. आवक वाढल्यानंतर कदाचित मक्याचे भाव स्थिर होतील.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता.6) लासलगावमध्ये मक्याची सर्वाधिक 242 क्विंटल आवक झाली, त्यास 1452 ते 2272 रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. खालोखाल सिल्लोड येथे मक्याची 235 क्विंटल आवक झाली, त्यास 1900 ते 2100 रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे मक्याची 100 क्विंटल आवक झाली, त्यास 1411 ते 1700 रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. म्हसावद येथे 120 क्विंटल आवक झाली, त्यास 1500 ते 1600 रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. अमळनेरमध्येही मक्याची 100 क्विंटल आवक झाली, त्याठिकाणी 1411 ते 1770 रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. चोपड्यात मक्याची 35 क्विंटल आवक झाली, त्यास सरासरी 1752 रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे मक्याची 19 क्विंटल आवक झाली, त्यास 1911 ते 2151 रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. नांदुऱ्यात 40 क्विंटल आवक झाली, त्यास 1870 ते 2051 रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. मोहोळमध्ये 34 क्विंटल आवक झाली, त्यास 2200 ते 2250 रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. किल्ले धारूर येथे 12 क्विंटल आवक झाली, त्यास 2151 ते 2151 रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. अमरावती येथे मक्याची फक्त 3 क्विंटल आवक झाली, त्यास 2000 ते 2100 रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. गेवराईमध्ये 3 क्विंटल आवक झाली, त्यास सरासरी 2000 रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. तासगावात 34 क्विंटल आवक झाली, त्यास 2250 ते 2270 रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. दोंडाईचा येथे 92 क्विंटल आवक झाली, त्यास 1731 ते 1800 रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. शहाद्यात मक्याची फक्त 1 क्विंटल आवक झाली, त्यास सरासरी 1590 रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)