maize market : मक्याला ‘या’ मार्केटमध्ये सर्वाधिक भाव, राज्यात दररोज 500 क्विंटलपर्यंत आवक

maize market : राज्यात खरीप हंगामातील मक्याच्या काढणीला आता चांगलाच वेग आला आहे. ठिकठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तरीही मक्याची दैनंदिन सरासरी जेमतेम 500 क्विंटलपर्यंत आवक होत आहे. दरम्यान, आवक कमी असल्याने सद्यःस्थितीत जेवढा मका बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी दाखल होत आहे, त्यास 1285 ते 2600 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, शनिवारी (ता.21 ऑक्टोबर) जळगाव येथील बाजार समितीत मक्याची सर्वाधिक 310 क्विंटल आवक झाली, त्यास 1531 ते 1731 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. खालोखाल छत्रपती संभाजीनगरला मक्याची 90 क्विंटल आवक झाली, त्यास 1500 ते 2100 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. नागपूरमध्येही मक्याची 40 क्विंटल आवक झाली, त्यास 1285 ते 1487 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. नगरमध्ये मक्याची 15 क्विंटल आवक झाली, त्यास सरासरी 1900 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. अमरावतीत मक्याची 3 क्विंटल आवक झाली, त्यास 2000 ते 2200 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. बुलडाण्यातही 5 क्विंटल आवक झाली, त्यास सरासरी 1400 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. धाराशिवमध्ये मक्याची 2 क्विंटल आवक झाली, त्यास सरासरी 1950 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. जालन्यात मक्याची 16 क्विंटल आवक झाली, त्यास 2050 ते 2150 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. पुण्यात मक्याची फक्त 2 क्विंटल आवक झाली, त्यास 2500 ते 2600 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.

WhatsApp Group
Previous articleApmc market | जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उडीद, मका, सोयाबीनची आवक वाढली
Next articleflower market : बाजारात झेंडुच्या फुलांची आवक घटली, दसरा- दिवाळीला भाव तेजीतच राहणार