गावशिवार न्यूज | कार्यक्षेत्रातील दूध उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील बरेच दूध उत्पादक संघ स्पर्धांचे आयोजन करतात. त्यात विजेत्या ठरलेल्या दूध उत्पादकांना आकर्षक बक्षिसे देखील दिले जातात. अशीच एक स्पर्धा कोल्हापुरच्या गोकूळ दूध संघाने नुकतीच आयोजित केली होती. त्यात दिवसाला सुमारे 40 लिटर दूध देणारी एचएफ गाय आणि 20 लिटर दूध देणाऱ्या जाफराबादी म्हशीचे मालक विजेते ठरले. ज्यांची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे. (Milk Production Competition)
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकूळच्या माध्यमातून कार्यक्षेत्रातील दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही 30 नोव्हेंबरला गोकूळ श्री स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात लिंगनूर कसबा नूल येथील लक्ष्मी दूध उत्पादक संस्थेचे सभासद विजय दळवी यांच्या जाफराबादी म्हशीने पहिला क्रमांक पटकावला. दळवी यांच्या म्हशीने एका दिवसात दोन्ही वेळचे मिळून सुमारे 20 लिटर 580 मिली दूध दिल्याची नोंद घेण्यात आली होती. याशिवाय सरवडे येथील किसनराव मोरे दूध उत्पादक संस्थेचे सभासद शांताराम साठे यांच्या एचएफ गायीने पहिला क्रमांक पटकावला. मोरे यांच्या गायीने एका दिवसात दोन्ही वेळचे मिळून सुमारे 40 लिटर 225 लिटर दूध दिल्याची नोंद घेण्यात आली होती.
म्हैस गटातील विजेते दूध उत्पादक
● श्री.विजय विठ्ठल दळवी (20.580 लिटर दूध), प्रथम बक्षिस 30 हजार रू.
● श्री.शुभम कृष्णा मोरे (19.500 लिटर दूध), द्वितीय बक्षिस 25 हजार रू.
● सौ.वंदना संजय जरळी (19.340 लिटर दूध), तृतीय बक्षिस 20 हजार रू.
गाय गटातील विजेते दूध उत्पादक
● श्री.शांताराम आनंदा साठे (40.225 लिटर दूध), प्रथम बक्षिस 25 हजार रू.
● श्री.दीपक संभाजी सावेकर (31.110 लिटर दूध) द्वितीय बक्षिस 20 हजार रू.
● श्री.करीम महमदह,नीफ मुल्ला (30.820 लिटर दूध) तृतीय बक्षिस 15 हजार रू.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)