पुणे शहरात 17 ते 21 जानेवारी पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे आयोजन

गावशिवार न्यूज | पुण्यात महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून 17 ते 21 जानेवारी दरम्यान ‘पौष्टिक तृणधान्य’ म्हणजेच मिलेट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट येथे राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते या महोत्सवाचे बुधवारी उद्घाटन होणार आहे. (Millet Festival)

मिलेट महोत्सवात राज्यभरातील स्वयंसहाय्यता बचतगट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्टअप कंपन्यांचा सहभाग असणार आहे. संबंधित सर्वांना सुमारे 50 स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राळा, सामा, कोद्रा ही तृणधान्ये आणि त्यापासून तयार करण्यात येणारे पदार्थ जसे की ज्वारीचा रवा, बाजरीच्या लाह्या, रागीची बिस्किटे, ज्वारीचे इडली-मिक्स, रागीचा डोसा मिक्स आदी नाविण्यपूर्ण उत्पादने थेट उत्पादकांकडून रास्त दराने ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत. याशिवाय महोत्सवात मिलेट उत्पादने, मूल्यवर्धीत प्रक्रिया उत्पादने व त्यांचे आरोग्यविषयक महत्त्व या विषयी नामांकित तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने, खरेदीदार-विक्रेते संमेलन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक विनायक कोकरे यांनी दिली आहे.

WhatsApp Group
Previous articleमंगळवारी (16 जानेवारी) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगावचे केळी भाव
Next articleआंबा उत्पादक शेतकऱ्यांना ‘इतक्या’ कोटी रूपयांची मिळणार व्याजमाफी