जळगाव शहर व परिसरात गुरूवारी दुपारनंतर मॉन्सूनची जोरदार हजेरी !

गावशिवार न्यूज । सीमेपर्यंत येऊन ठेपलेल्या मॉन्सूनची जोरदार हजेरी आज गुरूवारी (ता.13) पुन्हा दुपारनंतर जळगाव शहर व परिसरात लागली. पेरणीयोग्य अशा या पावसामुळे शेतकरी वर्ग देखील सुखावला. दरम्यान, पूर्वहंगामी उन्हाळी कपाशी पिकाची जोमदार वाढ या पावसाने आता होणार असून, बऱ्याच वर्षांनी जिल्ह्यात मृगाची पेरणी सुद्धा शक्य होणार आहे. (Monsoon Rain)

जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी पावसाची दमदार हजेरी लागली होती. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ममुराबाद येथील हवामान केंद्रावरील नोंदीनुसार त्या दिवशी सुमारे 93 मिलीमीटर पाऊस पडला होता. प्रत्यक्षात त्यानंतर पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. त्यामुळे पाऊस लांबणीवर पडतो की काय, अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली होती. सुदैवाने आज गुरूवारी पुन्हा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला. वीजांच्या कडकडाटासह जवळपास पाऊणतास पडलेल्या या पावसाने आता शेतीशिवार हिरवेगार होण्यास मोठी मदत होणार आहे. शेतकरी देखील वाफसा मिळताच खरिपाच्या पेरण्यांची लगबग करतील.

WhatsApp Group
Previous articleअबब…मुंबई बाजार समितीत जांभूळ सरासरी 25 हजार रूपये प्रति क्विंटल !
Next articleराज्याच्या ‘या’ भागात आज जोरदार पावसाचा अंदाज, खान्देशची कशी राहील स्थिती ?