अबब…मुंबई बाजार समितीत जांभूळ सरासरी 25 हजार रूपये प्रति क्विंटल !

गावशिवार न्यूज । मधुमेहींसाठी गुणकारी मानल्या जाणाऱ्या जांभळाचा हंगाम सध्या जोमात सुरू असून, ठिकठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये त्याची मोठ्या प्रमाणात आवक देखील सुरू आहे. दरम्यान, ग्राहकांच्या मागणीनुसार आवक नसल्याने विशेषतः मुंबई बाजार समितीत जांभळाला सुमारे 20000 ते 30000 आणि सरासरी 25000 रूपये प्रति क्विंटलचा भाव देखील मिळाला आहे. ( Mumbai Apmc )

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या विविध प्रकारच्या फळांची बऱ्यापैकी आवक होत आहे. खासकरून लोकल व हापूस आंब्याची त्याठिकाणी चांगली आवक सुरू आहे. चिकू तसेच डाळिंब, कलिंगड, अननस, लिची, चेरी या फळांचीही बऱ्यापैकी आवक होत आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, मुंबईत गुरूवारी (ता.13) हापूस आंब्याची 1468 क्विंटल आवक झाली आणि त्यास 22000 ते 25000 रूपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला. लोकल आंब्याची 4923 क्विंटल आवक होऊन 4000 ते 15000 रूपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला. जांभळाची 34 क्विंटल आवक होऊन 20000 ते 30000 रूपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला. चिकुची 24 क्विंटल आवक होऊन 4500 ते 5500 रूपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला. अननसाची 360 क्विंटल आवक होऊन 2500 ते 4500 रूपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला. डाळिंबाची 396 क्विंटल आवक होऊन 10000 ते 15000 रूपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला. कलिंगडाची 1760 क्विंटल आवक होऊन 1000 ते 1200 रूपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला.

WhatsApp Group
Previous articleजळगावच्या केळी उत्पादकांना आता मिळणार 01 लाख 70 हजार रूपये हेक्टरी नुकसान भरपाई !
Next articleजळगाव शहर व परिसरात गुरूवारी दुपारनंतर मॉन्सूनची जोरदार हजेरी !