पाल येथील कृषी विज्ञान केंद्रात ग्रामीण तरूणांसाठी मोफत मशरूम उत्पादन प्रशिक्षण

Mushroom Production Training : जळगाव जिल्ह्यातील पाल (ता.रावेर) येथील कृषी विज्ञान केंद्रात ग्रामीण तरुणांना कौशल्य आधारित प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. कारण, त्याठिकाणी कृषी विज्ञान केंद्र आणि आत्मा जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने मशरूम उत्पादन व मूल्यवर्धन तंत्रज्ञान या विषयावर सहा दिवसीय कौशल्य विकास (STRY) व प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहे. प्रवेश विनामूल्य असून, नाव नोंदणी मात्र आवश्यक आहे.

Free mushroom production training to rural youth at Agricultural Science Center, Pal

शेतकऱ्यांसाठी पाल येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे एरवी वर्षभर विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जातात. यावेळी खास ग्रामीण भागातील तरूणांना गावातच रोजगाराचे चांगले साधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने “मशरूम उत्पादन व मुल्य वर्धन तंत्रज्ञान” या विषयावरील विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन कृषी विज्ञान केंद्राने केले आहे. त्यात सहभागी होण्याचे आवाहन इच्छुक तरूणांना करण्यात आले असून, नोंदणी करण्यासाठी संबंधित उमेदवाराला पूर्ण नाव, शिक्षण व रहिवासाचा पत्ता, मोबाईल क्रमांक (whatsapp), आधार क्रमांक आणि ई मेल आयडी, जातीचा प्रवर्ग आदी माहिती भरावी लागेल. सदरची माहिती प्रशिक्षण समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र पाल यांना 9970661546 या व्हाट्सऍप क्रमांकावर पाठवावी. अचूक माहिती पाठविल्यानंतर त्याच क्रमांकावरून तुमची नोंदणी निश्चित झाल्याचा रिप्लाय मिळेल. जागा मर्यादित असल्याने लवकरात लवकर नाव नोंदणी करणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल, असे कृषी विज्ञान केंद्रातर्फे कळविण्यात आले आहे.

WhatsApp Group
Previous articleजाणून घ्या, उत्तरप्रदेशात सध्या ‘कसे’ आहेत केळीचे भाव ?
Next articleविदर्भात थंडीची लाट, गोंदियात निच्चांकी 12.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद