अमरावतीमध्ये बुधवारपासून भव्य राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन

National Agriculture Exibition : डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त अमरावती येथे चार दिवसीय भव्य राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे सुमारे 70 एकरावर आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन बुधवारी (ता.27) मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी शेती आणि शेतकऱ्यांविषयी असलेल्या समर्पणाच्या भावनेतून 11 डिसेंबर 1959 ते 27 फेब्रुवारी 1960 या कालावधीत सुमारे 100 एकर जागेवर भव्य दिव्य असे कृषी प्रदर्शन भरविले होते. तब्बल 82 दिवस चाललेल्या त्या कृषी प्रदर्शनासारखे दुसरे कृषी प्रदर्शन नंतरच्या काळात भारत देशात कधीच भरले नाही, हे विशेष. भाऊसाहेबांच्या त्या कार्याला उजाळा देण्याचा प्रयत्न त्यांच्या स्मृतीदिनी यंदाही केला जात आहे. त्यासाठी सुमारे 70 एकरावर राष्ट्रीय कृषी प्रदर्शन भरविले जाणार असून, राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे त्याचे उद्घाटन करणार असल्याची माहिती श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी स्वतः दिली आहे.

कृषी प्रदर्शनाला यांची असेल प्रमुख उपस्थिती

डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अमरावती येथे भरणाऱ्या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाध्यक्ष म्हणून श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख राहतील. यावेळी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.सी.डी.मायी, राज्याच्या दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चू कडू, खासदार नवनीत राणा, खासदार रामदास तडस. राज्यसभा सदस्य डॉ.अनिल बोंडे, आमदार ऍड.यशोमती ठाकूर, आमदार रवी राणा, सुलभा खोडके, राजकुमार पटेल, बळवंत वानखेडे, प्रताप अडसड, देवेंद्र भुयार, आ.प्रवीण पोटे पाटील, किरन सरनाईक, धीरज लिंगाडे, जिल्हाधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा परिषदेचे सीईओ अविशांत पंडा, जळगावच्या जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, अमरावतीचे विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, राष्ट्रीय कृषी प्रदर्शन समितीचे अध्यक्ष दिलीपबाबू इंगोले आदी उपस्थित असतील.

WhatsApp Group
Previous articleउद्या मंगळवारी (ता. 26 डिसेंबर) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव
Next articleकोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये 5 जानेवारीपर्यंत ‘हा’ मोठा बदल