केंद्र सरकार कांदा निर्यातबंदी संदर्भात शेतकरी हिताचा घेणार निर्णय

गावशिवार न्यूज | निर्यातबंदीमुळे कांद्याचे दर पडल्याने संबंधित सर्व शेतकऱ्यांना खूप मोठे नुकसान सोसावे लागले आहे. त्यामुळे कांदा निर्यातबंदी उठवावी आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे इतर प्रश्न मार्गी लावावे अशी मागणी खासदार सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन केली होती. त्यावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय केंद्र सरकार लवकरच घेईल, असे आश्वासन श्री. शहा यांनी दिले आहे. (Onion Export Ban)

महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने कांद्याचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे केंद्र सरकारने लागू कांदा निर्यातबंदीचा सगळ्यात जास्त फटका तिन्ही जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना बसला आहे. कांदा निर्यातबंदीमुळे मागणी घटल्याच्या स्थितीत संबंधित सर्व शेतकऱ्यांना कांद्यासाठी पाहिजे तसा भाव मिळू शकलेला नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून निर्यातबंदी हटवावी किंवा नाफेडमार्फत कांदा खरेदी करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे केली. केंद्राने कांदा निर्यातबंदी हटविण्याबाबतचा निर्णय तातडीने किंवा आगामी काळात तातडीने घेतल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकणार आहे. कारण, कांद्याची आवक वाढल्यानंतर ठिकठिकाणच्या बाजार समित्यांमध्ये दर मोठ्या प्रमाण पडले आहेत. व्यापारी वर्ग अतिशय कमी किमतीत कांद्याची खरेदी करताना दिसत आहेत.

WhatsApp Group
Previous articleगुजरातमधील सुरत बाजार समितीत केळीला मिळाला ‘इतका’ दर
Next articleगुरूवार (ता. 08 फेब्रुवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळी भाव