onion market | नाशिक जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सध्या साठवणुकीतील उन्हाळी कांद्याची आवक वाढली असून, या कांद्याला सरासरी 2400 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला आहे. उन्हाळी कांद्याचे भाव नवीन कांद्याची आवक होत नाही तोपर्यंत थोडेफार तेजीतच राहण्याची शक्यता व्यापारी वर्गाने वर्तविली आहे.
नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (ता.13 ऑक्टोबर) उन्हाळी कांद्याची सुमारे 54,085 क्विंटल आवक झाली, त्यास 688 ते 2769 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. बाजरीची 6 क्विंटल आवक झाली, बाजरीला 1750 ते 2555 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. मक्याची 230 क्विंटल आवक झाली, त्यास 1505 ते 1680 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. फळांमध्ये चिकुची 18 क्विंटल आवक झाली, त्यास 1300 ते 2500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. डाळिंबाची 105 क्विंटल आवक झाली, त्यास 600 ते 15000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. केळीची 250 क्विंटल आवक झाली, केळीला 450 ते 1050 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. मोसंबीची 180 क्विंटल आवक झाली, मोसंबीला 2000 ते 3000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. पेरूची 20 क्विंटल आवक झाली, त्यास 2500 ते 4500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. सफरचंदाची 174 क्विंटल आवक झाली, त्यास 6000 ते 13000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. संत्र्याची 200 क्विंटल आवक झाली, त्यास 2000 ते 4500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. टरबुजाची 30 क्विंटल आवक झाली, त्यास 1300 ते 2200 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. शहाळ्याची 100 क्विंटल आवक झाली, त्यास 2500 ते 5000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.