Onion Market: राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी नाशिक, कोल्हापूर, सांगली आणि छत्रपती संभाजीनगर वगळता अन्य ठिकाणी सध्या कांद्याची आवक खूपच कमी झाली आहे. नव्या लागवडीच्या कांद्याची आवक लांबल्याच्या स्थितीत उन्हाळी कांद्याचे भाव त्यामुळे चांगलेच तेजीत आले आहेत. किरकोळ बाजारातही कांदा 50 रूपये किलोप्रमाणे किंवा त्यापेक्षा जास्त भावाने विकला जातो आहे. अर्थात, शेतात विक्रीयोग्य कांदा तयार नसल्याने शेतकरी वर्गाला सध्याच्या भाववाढीचा फार फायदा होत नसल्याचे दिसून आले आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, शनिवारी (ता. 28 ऑक्टोबर) नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळी कांद्याची सर्वाधिक 24,392 क्विंटल आवक झाली, त्यास 1625 ते 5288 रूपये आणि सरासरी 4658 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. नाशिकमध्येच लाल कांद्याची 32 क्विंटल आवक झाली, त्यास 2011 ते 4900 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. कोल्हापुरात उन्हाळी कांद्याची 6564 क्विंटल आवक झाली, त्यास 2000 ते 6000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. स्थानिक लाल कांद्याची 200 क्विंटल आवक झाली, त्यास 2800 ते 5200 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. सांगलीत स्थानिक कांद्याची 3839 क्विंटल आवक झाली, त्यास 1600 ते 5600 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. छत्रपती संभाजीनगरात कांद्याची 1482 क्विंटल आवक झाली, त्यास 2000 ते 5500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. नागपुरात लाल कांद्याची 700 क्विंटल आवक झाली, त्यास 4000 ते 5600 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. नागपुरात पांढऱ्या कांद्याची 700 क्विंटल आवक झाली, त्यास 5000 ते 6400 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. पुण्यात स्थानिक कांद्याची 434 क्विंटल आवक झाली, त्यास 2250 ते 4600 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळी कांद्याची फक्त 2 क्विंटल आवक झाली, त्यास 2000 ते 2500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. दरम्यान, नवीन कांद्याची आवक वाढत नाही तोपर्यंत उन्हाळी कांदा भाव खाऊन जाईल, अशी माहिती व्यापारी वर्गाने दिली.