Onion Market: कांद्याला बाजार समित्यांमध्येच 5000 ते 6000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव

Onion Market: केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लागू केलेले 40 टक्के शूल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी येणारा कांदा आता जास्तीत जास्त 6000 रूपये प्रतिक्विंटलच्या भावाने विकला जातो आहे. तयार मालाचा तुटवडा लक्षात घेता कांदा आणखी किती भाव खातो, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार सोमवारी (ता.30 ऑक्टोबर) राज्यभरात कांद्याची एकूण सुमारे 81 हजार 877 क्विंटल आवक झाली. त्यापैकी नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत साठवणुकीतील उन्हाळी कांद्याची सर्वाधिक सुमारे 43 हजार 600 क्विंटल आवक झाली, त्यास 1733 ते 5124 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. मुंबईतही उन्हाळी कांद्याची 18 हजार 302 क्विंटल आवक झाली, त्यास 3000 ते 5200 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. पुण्यात स्थानिक कांद्याची 11 हजार 480 क्विंटल आवक झाली, त्यास 2625 ते 5100 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. नागपूरमध्ये लाल कांद्याची 1800 क्विंटल आवक झाली, त्यास 4400 ते 6000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. नागपूरमध्येच पांढऱ्या कांद्याची 1000 क्विंटल आवक झाली, त्यास 5000 ते 6400 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. कोल्हापुरात उन्हाळी कांद्याची 4736 क्विंटल आवक झाली, त्यास 1500 ते 5500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. छत्रपती संभाजी नगरात उन्हाळी कांद्याची 629 क्विंटल आवक झाली, त्यास 1200 ते 5000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. साताऱ्यात कांद्याची 150 क्विंटल आवक झाली, त्यास 5000 ते 5500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. सोलापुरात 150 क्विंटल आवक झाली, त्यास 5000 ते 5300 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.

WhatsApp Group
Previous articleBanana Farmer Success Story: म्हशींच्या गोठ्यातील सांडपाण्यावर केळीच्या 52 किलो घडांचे घेतले उत्पादन
Next articleCotton Market: कापसाचे उत्पादन यंदा 15 वर्षातील निच्चांकी पातळीवर, भाव तेजीत राहणार ?