राज्यात कांदा 1450 ते 2375 रूपये प्रतिक्विंटल

पुणे । राज्यातील ठिकठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सध्या साठवणुकीच्या उन्हाळी लाल कांद्याची आवक बऱ्यापैकी होताना दिसते आहे. कांद्याला 1450 ते 2375 रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला असून, जास्त आवक पुणे व परिसरातील बाजार समित्यांमध्ये झाली आहे. विशेषतः मंचरला कांद्यास सर्वाधिक 2375 रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

महाराष्ट्र राज्य कृषी मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, रविवारी (ता. 24) मंचरला कांद्याची 12379 क्विंटल आवक झाली, त्यास 2000 ते 2750 रुपये आणि सरासरी 2375 रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला. जुन्नर- आळेफाटा येथे कांद्याची 9253 क्विंटल आवक झाली, त्यास 1100 ते 2800 आणि सरासरी 2200 रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला. पुण्यात स्थानिक कांद्याची 12790 क्विंटल आवक झाली, त्यास 900 ते 2500 आणि सरासरी 1700 रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला. जुन्नर- ओतूर येथे 16142 क्विंटल आवक झाली, त्यास 1200 ते 2650 रुपये आणि सरासरी 2000 रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला. पुणे-मोशी येथे 351 क्विंटल आवक होऊन 700 ते 2200 रुपये आणि सरासरी 1450 रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला.
वैजापूरमध्ये 8244 क्विंटल आवक झाली, त्यास 600 ते 2320 रुपये आणि सरासरी 1800 रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला. पारनेरमध्ये 8910 क्विंटल आवक झाली, त्यास 300 ते 2800 रुपये आणि सरासरी 1975 रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला. राहता येथे 5100 क्विंटल आवक झाली. तिथे 700 ते 2800 रुपये, सरासरी 1900 रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

WhatsApp Group
Previous articleहिरव्या मिरचीची आवक घटली, दर 10 ते 40 रूपये प्रतिकिलो
Next articleagriinfra : कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत वित्त पुरवठा सुविधा योजना