Onion Market Rate: ठिकठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये इतक्या दिवसांपासून नियमितपणे होत असलेली कांद्याची आवक आता लक्षणीय घटली आहे. राज्यात आठवडाभरापूर्वी कांद्याची दैनंदिन सुमारे दोन ते अडीच लाख क्विंटलपर्यंत आवक होती, ती आता 50 ते 60 हजार क्विंटलपर्यंत खाली आली आहे. अर्थात, मागणी चांगली असल्याने जेवढ्या काही कांद्याची सध्या आवक होत आहे, त्यास बऱ्यापैकी भाव सुद्धा मिळताना दिसत आहे.
Inflow of onion has decreased in the state, currently the price is ‘such’ in the market
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, सोमवारी (ता.06 नोव्हेंबर) राज्यभरात कांद्याची सुमारे 62 हजार 665 क्विंटल आवक झाली. पैकी नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत साठवणुकीतील उन्हाळी कांद्याची सर्वाधिक 41,591 क्विंटल आवक झाली. त्याठिकाणी कांद्याला 1119 ते 3917 रूपये, सरासरी 3200 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. खालोखाल पुण्यात स्थानिक कांद्याची 7756 क्विंटल आवक झाली, त्यास 1667 ते 3867 रूपये व सरासरी 2767 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. कोल्हापुरात लाल कांद्याची 5662 क्विंटल आवक झाली, त्यास 1500 ते 4800 रूपये आणि सरासरी 3000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. सांगलीत लोकल कांद्याची 4990 क्विंटल आवक झाली, त्यास 800 ते 4000 रूपये व सरासरी 2400 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. छत्रपती संभाजीनगरात स्थानिक कांद्याची 1249 क्विंटल आवक झाली, त्यास 2400 ते 3600 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. तर उन्हाळी कांद्याची 366 क्विंटल आवक झाली, त्यास 1500 ते 4000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. जळगाव बाजार समितीत लाल कांद्याची 856 क्विंटल आवक झाली, त्यास 1325 ते 3375 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. नागपुरात लोकल कांद्याची 14 क्विंटल आवक झाली, त्यास राज्यात सर्वाधिक 5500 ते 6500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. सोलापुरात लोकल कांद्याची 144 क्विंटल आवक झाली, त्यास 700 ते 4000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)