Onion Market Rate : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून होत असलेली साठवणुकीतील उन्हाळी कांद्याची आवक आता कमी झाली आहे. सध्या उन्हाळी कांद्याच्या बरोबरीने नवीन हंगामातील लाल कांद्याची सुद्धा आवक होत आहे. ग्राहकांची मागणी चांगली असल्याने लाल कांद्याला भाव सुद्धा समाधानकारक मिळाले आहेत.
In the market committees of the state, the price of red onion is slowly eating away
महाराष्ट्र् राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, राज्यातील ठिकठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मंगळवारी (ता.28) सुमारे 61 हजार 999 क्विंटल कांद्याची आवक झाली. पैकी नाशिकमध्ये सर्वाधिक 24,610 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली आणि त्यास 1757 ते 4502 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. नाशिकमध्येच पोळ कांद्याची 9000 क्विंटल आवक झाली आणि त्यास 2000 ते 4791 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. याशिवाय लाल कांद्याची 6840 क्विंटल आवक झाली, त्यास 1717 ते 4504 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. पुण्यात स्थानिक कांद्याची 7904 क्विंटल आवक झाली, त्यास 2400 ते 3867 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. मुंबईमध्ये लाल कांद्याची 6236 क्विंटल आवक झाली, त्यास 3000 ते 4600 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. कोल्हापूरात 3617 क्विंटल आवक झाली, त्यास 1500 ते 4800 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. नागपुरात लाल कांद्याची 700 क्विंटल आवक झाली, त्यास 3000 ते 4000 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. नागपुरातच पांढऱ्या कांद्याची 700 क्विंटल आवक झाली आणि त्यास 4000 ते 5000 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. जळगावमध्ये उन्हाळी कांद्याची 14 क्विंटल आवक झाली, त्यास 3500 ते 4200 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. ठाण्यात लाल कांद्याची 13 क्विंटल आवक झाली, त्यास 3200 ते 4000 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. साताऱ्यात स्थानिक कांद्याची 146 क्विंटल आवक झाली, त्यास 2000 ते 4000 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.