निर्यातबंदीनंतर राज्यात कांद्याची आवक रोडावली, भावातही घसरण

Onion Market Rate : केंद्र सरकारने लादलेल्या निर्यातबंदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील कांद्याची विक्री जवळपास थांबवली आहे. त्याचा मोठा परिणाम ठिकठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कांद्याच्या आवकेवर झाला असून, राज्यात सर्वसाधारण परिस्थितीत होणाऱ्या आवकेच्या तुलनेत आता 25 टक्केही कांदा आवक राहिलेली नाही. दरम्यान, सध्या जेवढा काही कांदा बाजारात विक्रीसाठी दाखल होत आहे, त्याच्या भावात घसरण झाली आहे.

After the export ban, the import of onion in the state has decreased, the price has also fallen

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता.09 डिसेंबर) राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये जेमतेम 27 हजार 258 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. एरवी राज्यात कांद्याची दीड ते दोन लाख क्विंटल किंवा त्यापेक्षा जास्त आवक होत असते. शनिवारी कोल्हापुरात कांद्याची सर्वाधिक 6903 क्विंटल आवक झाली आणि त्यास 1500 ते 4500 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. नाशिकमध्ये लाल कांद्याची 5950 क्विंटल आवक झाली, त्यास 1000 ते 3000 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. तसेच उन्हाळी कांद्याची 400 क्विंटल आवक झाली, त्यास 1351 ते 4382 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. पोळ कांद्याची 2300 क्विंटल आवक झाली, त्यास 1200 ते 3225 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. छत्रपती संभाजीनगरात कांद्याची 2310 क्विंटल आवक झाली, त्यास 1200 ते 3800 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. अहमदनगरात लाल कांद्याची 1851 क्विंटल आवक झाली, त्यास 500 ते 3500 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. अकोल्यात कांद्याची 1140 क्विंटल आवक झाली, त्यास 2000 ते 3500 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. जळगावमध्ये लाल कांद्याची 1768 क्विंटल आवक झाली, त्यास 527 ते 2377 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. तसेच उन्हाळी कांद्याची 09 क्विंटल आवक झाली, त्यास 2000 ते 3000 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. नागपुरात लाल कांद्याची 1380 क्विंटल आवक झाली, त्यास 2500 ते 4000 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. तसेच पांढऱ्या कांद्याची 1000 क्विंटल आवक झाली, त्यास 3000 ते 4000 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. पुण्यात लाल कांद्याची 627 क्विंटल आवक झाली आणि त्यास 1000 ते 4000 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. साताऱ्यात हालवा कांद्याची 201 क्विंटल आवक झाली, त्यास 3500 ते 4500 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

WhatsApp Group
Previous articleजळगाव ते मनमाड तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम 75 टक्के पूर्ण
Next articleइथेनॉल बंदी, कांदा निर्यातबंदी हटविण्यासाठी अमित शहांची भेट घेणार उपमुख्यमंत्री अजित पवार