Onion Market Rate : काही दिवसांपूर्वी बाजारात 50 रूपये किलोपेक्षा जास्त भावाने विक्री झालेल्या कांद्याने सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणले होते. मात्र, तोच कांदा आता पाच रूपये किलोच्या भावाने विकला जात असून, त्याने शेतकऱ्यांच्याच डोळ्यात पाणी आणले आहे. अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी कांद्याच्या भावाची सुरूवात 500 ते 700 रूपये प्रतिक्विंटलपासून झाली आहे.
Onion, which used to cost a lot a few days ago, is now priced at Rs 5 per kg
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, सोमवारी (ता.25 डिसेंबर) दुपारी 4 वाजेपर्यंत राज्यात एकूण सुमारे 55 हजार 873 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. पैकी नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याची सर्वाधिक 18 हजार 484 क्विंटल आवक झाली होती, त्यास 583 ते 1775 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. नाशिकमध्येच उन्हाळी कांद्याची 100 क्विंटल आवक झाली, त्यास 1000 ते 1525 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. पोळ कांद्याची 12 हजार 995 क्विंटल आवक झाली, त्यास 650 ते 2066 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. पुण्यात लोकल कांद्याची 12,010 क्विंटल आवक झाली आणि त्यास 975 ते 2100 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. याशिवाय पुण्यात लाल कांद्याची 369 क्विंटल आवक झाली, त्यास 700 ते 3000 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. सांगलीत लोकल कांद्याची 4560 क्विंटल आवक झाली, त्यास 700 ते 2500 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. साताऱ्यात लाल कांद्याची 2350 क्विंटल आवक झाली, त्यास 500 ते 2050 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. कोल्हापुरात कांद्याची सुमारे 5005 क्विंटल आवक झाली, त्यास 500 ते 3500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.