माता, पिता अन् गुरू हेच तुमच्या आयुष्याचे खरे ब्रेक : पंडित प्रदिप मिश्रा

Pandit Pradip Mishra : क्लच आणि गियरशिवाय वाहन रस्त्यांवर धावू शकते, पण ब्रेक नसल्यावर वाहन जागचे हलविता येत नाही. त्याप्रमाणे आपल्या जीवनात अनिर्बंध मनाला आवर घालण्याचे काम माता, पिता आणि गुरू करतात. तेच आपल्याला चुकीच्या मार्गाने जाऊ देत नाही, काय चांगले आणि काय वाईट हे त्यांच्याशिवाय दुसरे कोणी चांगल्याप्रकारे सांगत नाही. त्यामुळे माता, पिता व गुरू हेच खरे तुमच्या आयुष्याचे ब्रेक असतात. त्यांच्या उपदेशांचा नेहमी आदर करा, असे प्रतिपादन पंडित प्रदिप मिश्रा यांनी केले.

Mother, Father and Guru are the real break in your life: Pandit Pradeep Mishra

जळगाव जिल्ह्यातील वडनगरी फाटा येथे बडे जटाधारी महादेव मंदिराजवळ मंगळवारी (ता.05) सात दिवसीय श्री शिवमहापुराण कथा कार्यक्रमाला सुरूवात झाली. त्यास उपस्थित हजारोंच्या समुदायासमोर पंडित प्रदिप मिश्रा यांनी व्यावहारिक उदाहरणे देत अतिशय साध्या व सरळ शब्दात जीवनाचा अर्थ उलगडला. कथा कार्यक्रमाला पहिल्या दिवशी जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्र व परराज्यातील भाविकांची अलोट गर्दी उसळली होती. आयोजकांनी उभारलेला भव्य मंडप अपूर्ण पडल्याने उन्हात बाहेर जागा मिळेल तिथे बसून भाविक कथा श्रवणाचा लाभ घेत होते. जळगाव शहर तसेच चोपडा, यावल, भुसावळ शहरांकडून कथा स्थळाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली होती. कथा स्थळापासून पाच ते सात किलोमीटर अंतरापर्यंत खासगी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेकांना वाहतुकीच्या कोंडीत सापडल्याने कथा स्थळाकडे वेळेवर पोहोचता आले नाही. पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त राखल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

10 हजार रूपये कमावणारा जास्त सुखी

फायद्याचे लोक पाहण्यापेक्षा कायद्याचे लोक आपल्या आयुष्यात आणा, ज्यामुळे तुमचे जीवन अधिक समृद्ध होईल. 10 लाख रूपये महिना कमावणाऱ्यापेक्षा 10 हजार रूपये कमावणारे जास्त सुखी असतात. जास्त कमाई करणारे मधुमेह, बीपीच्या गोळ्या घेतल्याशिवाय रात्री झोपू शकत नाही. मोठेपणात जेवढा सुख नाही त्यापेक्षा जास्त सुख लहान बनण्यात आहे. जेवढे लहान बनून राहाल, तितके तुम्ही परमात्म्याच्या जवळ राहाल. जिथे जागा मिळेल तिथे समाधान माना. जळगावकरांना श्री शिवमहापुराण कथा श्रवणाची मोठी संधी मिळाली आहे. त्यासाठी चौधरी परिवाराला धन्यवाद दिले पाहिजे. कथा वाचणाऱ्यांपेक्षा एकणारा जास्त श्रेष्ठ असतो. झुकणे कधीही चांगले असते. मणुष्याच्या अंगी नम्रता असली पाहिजे, असेही पंडित प्रदिप मिश्रा यांनी सांगितले.

WhatsApp Group
Previous articleमहाराष्ट्रातील साखर उत्पादन ‘या’ कारणाने घटण्याची शक्यता
Next articleकेळी उत्पादकांना विमा भरपाई देणार केव्हा ? खासदार रक्षा खडसे यांचा केंद्रिय कृषीमंत्र्यांना सवाल