Papaya Grant : बिहार राज्यात पपई लागवडीसाठी मिळते हेक्टरी 45 हजार रूपयांचे अनुदान

Papaya Grant : कोरडे उष्ण हवामान असलेल्या वातावरणात ओलिताची सोय असलेल्या ठिकाणी भरघोस उत्पादन देणाऱ्या पपईची शेती संपूर्ण भारतात केली जाते. मात्र, बिहार राज्य पपई लागवडीत विशेष अग्रेसर आहे. तेथील पपई उत्पादक शेतकऱ्यांना बिहार शासनाकडून पपई लागवडीसाठी हेक्टरी 45 हजार रूपयांचे अनुदान देखील आता देण्यात येत आहे.

पपईचे उत्पादन हाती आल्यानंतर मिळणारी फळे आरोग्यदायी मानली जातात. विशेषतः हिवाळ्यात पपईची मागणी त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढते. पपईपासून ट्रुटीफ्रुटी तयार करणाऱ्या उद्योगांना सुद्धा चालना मिळते. अशा या फळाच्या लागवडीला आणखी गती मिळावी आणि शेतकऱ्यांचे अर्थकारण सुधारावे म्हणून बिहार शासनाने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून विशेष उपक्रम सुरू केला आहे. त्याद्वारे बिहार राज्यातील शेतकऱ्यांना पपई लागवडीसाठी हेक्टरी 60 हजार रूपये खर्च गृहीत धरून त्यापैकी सुमारे 75 टक्के म्हणजेच तब्बल 45 हजार रूपयांचे अनुदान देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पपई लागवडीसाठी हेक्टरी फक्त 15 हजार रूपये स्वतःचे खर्च करावे लागत आहेत. साहजिक शासनाकडून अनुदान मिळू लागल्यापासून बिहारमधील पपई लागवडीखालील क्षेत्रात चांगलीच वाढ झाली आहे.

ऑनलाईन अर्ज केल्यानंतर मिळते अनुदान

बिहार शासनाने पपई उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी सुमारे 45 हजार रूपये अनुदानाचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्जाचा पर्याय ठेवला आहे. त्यासाठी शासनाने horticulture.bihar.gov.in या संकेतस्थळावर शेतकऱ्यांना नोंदणी करण्याची सोय देखील उपलब्ध केली आहे. पपई लागवडीसाठी इच्छुक असलेले शेतकरी फलोत्पादन विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन शासनाच्या अनुदानासाठी अर्ज करू शकतात. याशिवाय फलोत्पादन विभागाच्या कार्यालयाशी अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकतात.

WhatsApp Group
Previous articleBanana Market Rate : रविवारी (07 जानेवारी) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव
Next articleEgg Rate Today : छत्रपती संभाजीनगरात अंड्यांना सर्वाधिक 6.73 रूपये प्रति नग दर