Poultry Industry : शालेय पोषण आहारात अंडी वापरल्याने पोल्ट्री उद्योगाला राज्यात मिळेल चालना

Poultry Industry : पहिली ते पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात आठवड्यातून एकदा दर बुधवारी किंवा शुक्रवारी नियमित खिचडीसोबत अंडा भुर्जी, अंडा पुलाव, अंडा बिर्याणी किंवा उकडलेली अंडी देण्याचे नियोजन शासनाने केले आहे. त्यामुळे राज्यातील पोल्ट्री उद्योगाला मोठी चालना मिळून ग्रामीण भागातील रोजगार वाढीलाही प्रोत्साहन मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

The use of eggs in school nutrition will boost the poultry industry in the state

केंद्रिय मत्स्य, पशुपालन आणि दुग्ध विकास विभाग मंत्रालयाच्या ताज्या पशुपालन सांख्यिकी अहवालानुसार, संपूर्ण भारत देशात सन 2021/22 मध्ये सुमारे 750 कोटी अंडी उत्पादन झाले होते. त्यानंतरच्या दुसऱ्या वर्षात म्हणजेच 2022/23 मध्ये अंडी उत्पादनात पुन्हा वाढ झाली आणि ते सुमारे 900 कोटींपर्यंत पोहोचले. अंडी उत्पादनात देशात अग्रेसर असलेल्या राज्यांमध्ये प्रामुख्याने आंध्रप्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा, पश्चिम बंगाल, कर्नाटक या राज्यांचा समावेश आहे. तुलनेत महाराष्ट्र राज्य हे अंडी उत्पादनाच्या बाबतीच खूपच पिछाडीवर आहे. शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेश केल्यानंतर स्थानिक पातळीवर अंडी उत्पादन करणाऱ्या पोल्ट्री उद्योगाला मोठा बूस्ट मिळू शकतो. सध्या महाराष्ट्रात जेवढी काही पोल्ट्री फार्म्स कार्यरत आहेत, त्यांच्यापैकी बहुतांश फार्म्सवर विशेषकरून मांसल ब्रायलर कोंबड्यांचे उत्पादन घेतले जाते. शालेय पोषण आहारात अंडी वापरण्याचे प्रमाण वाढल्यानंतर लेयर पोल्ट्री फार्म सुरु करण्यासाठी सुरुवात होऊ शकते. त्याकरीता ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरूणही पुढे येऊ शकतील.

केळी उत्पादकांनाही मिळेल हमीचे मार्केट

राज्यातील अंडी उत्पादक शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळावी म्हणून शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेश केल्याचे शासनाने त्यांच्या परिपत्रकात म्हटले आहे. ज्या विद्यार्थ्यांना अंडी खाणे आवडत नाही त्यांच्यासाठी केळी किंवा एखाद्या पर्यायी फळाची व्यवस्था करण्याचेही आदेश शासन परिपत्रकान्वये देण्यात आले आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर केळीचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही यानिमित्ताने मोठी संधी चालून आली आहे. आहारातील बदलाबाबत शालेय पोषण समितीकडून शाळांशी पत्रव्यवहार सुरू असून, चालू आठवड्यापासून विद्यार्थ्यांना खिचडीसोबत अंडी किंवा केळी खाण्यास दिली जाणार आहेत.

WhatsApp Group
Previous articleWhether Update : अरे देवा, राज्यात आज पुन्हा वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा
Next articleOnion Market Rate : राज्यातील बाजार समित्यांमध्ये लाल कांदा हळूहळू खातोय भाव