जळगावमध्ये दिवाळीपूर्वीच झेंडुच्या फुलांना किरकोळ बाजारात 80 रूपये किलोचा भाव

Price of marigold flowers: दसऱ्याच्या सणाला झेंडुच्या फुलांना अपेक्षेनुसार भाव न मिळाल्याने शेतकरी खूपच निराश झाले होते. दिवाळीला तरी झेंडू महाग जाईल, अशी आशा त्यामुळे सर्वजण बाळगून होते. प्रत्यक्षात दिवाळीच्या सणालाही झेंडुच्या फुलांना बाजार समितीत फार काही चांगला भाव मिळू शकलेला नाही. दुसरीकडे जळगाव शहरातील किरकोळ बाजारात मात्र झेंडुची फुले 80 रूपये किलोपर्यंत विकली गेली.

Even before Diwali in Jalgaon, marigold flowers are priced at Rs 80 per kg in the retail market

चांगल्या भावाच्या आशेने झेंडुची शेती फुलविणाऱ्या शेतकऱ्यांनी दसरा सणाला निराशा झाल्यानंतर शेतातील बहुतांश पीक संतापाच्या भरात उपटून फेकले होते. त्यामुळे दिवाळीला झेंडुच्या फुलांची बाजारात म्हणावी तशी होताना दिसत नाहीए. तरीही झेंडुला होलसेल मार्केटमध्ये अपेक्षित भाव मिळालेला नाही. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी (ता. 09 नोव्हेंबर) एकट्या पुणे बाजार समितीत झेंडुच्या फुलांची सुमारे 355 क्विंटल आवक झाली होती आणि त्यास 2000 ते 4000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. शुक्रवारी (ता.10) नागपुरात झेंडुची 7 क्विंटल आवक झाली आणि त्यास 2000 ते 3000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. शनिवारी (ता.11) अहमदनगरसह जळगाव, नागपूर येथील बाजार समित्यांमध्ये जेमतेम 38 क्विंटल झेंडुची आवक नोंदवण्यात आली. पैकी अहमदनगरात फक्त 1 क्विंटल झेंडुची आवक झाली आणि त्यास सरासरी 3000 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. जळगावमध्ये झेंडुची 23 क्विंटल आवक झाली, त्यास 2000 ते 2500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. नागपूरमध्ये झेंडुची 14 क्विंटल आवक झाली, त्यास 3500 ते 4500 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

WhatsApp Group
Previous articleभडगाव, रावेर, भुसावळ, चोपडा, यावल, पाचोरा, जळगावच्या शेतकऱ्यांना 3.25 कोटींची भरपाई
Next articleअंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबांना आता दरवर्षी एक साडी मोफत मिळणार