Pune To Chhatrapati Sambhajinagar Expressway : पुणे ते छत्रपती संभाजीनगर हे सुमारे 225 किलोमीटरचे अंतर आता फक्त दोन तासात पार करता येईल. दोन्ही शहरामंध्ये प्रस्तावित असलेल्या द्रुतगती महामार्गाला लवकरच चालना देण्यात येणार असल्याची घोषणा केद्रिय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत केली आहे. बांधा, वापरा व हस्तांतरीत करा, या योजनेंतर्गत सदरच्या महामार्गाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
It takes just 2 hours to reach Chhatrapati Sambhajinagar from Pune
देशातील सुमारे 8 हजार 544 किलोमीटर लांबीचे तब्बल 321 राष्ट्रीय महामार्ग पूर्ण करण्याचे कार्य रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने हाती घेतले आहे. सुमारे 1 लाख 49 हजार 758 कोटी रूपयांच्या या सर्व प्रकल्पांचा विकास करताना आर्थिक, धार्मिक व पर्यटन विषयक दृष्टीकोन समोर ठेवण्यात आला आहे. त्यादृष्टीने सोयीसुविधांवर लक्ष दिले जात असल्याचे केंद्रिय मंत्री श्री.गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा द्रुतगती महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून तयार केला जाणार आहे. त्यासाठी सुमारे 12 हजार कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असून, 140 किलोमीटर प्रतितास वेगाने वाहने या नवीन महामार्गावरून धावतील.
प्रत्यक्ष काम सुरु होण्याची आता आहे प्रतिक्षा
पुणे, अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर, अशा तीन जिल्ह्यांमधून जाणाऱ्या प्रस्तावित द्रुतगती महामार्गासाठीची प्राथमिक अधिसूचना डिसेंबर 2022 मध्येच निघाली होती. प्रत्यक्षात प्रस्तावासह डीपीआरचे सादरीकरण, निविदा प्रक्रिया, केंद्राची मंजुरी, भूसंपादनासाठी आर्थिक तरतूद, असे अनेक विषय अद्याप मार्गी लागू शकले नव्हते. त्यामुळे या द्रुतगती महामार्गाची घोषणा हवेतच विरते की काय, अशी शंका जनसामान्यांना वाटू लागले होते. पंरतु, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा द्रुतगती महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्याची आता पुन्हा घोषणा केली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात काम केव्हा सुरू होते, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)