Rain Update : राज्याच्या या भागात आज विजांच्या कडकडाटासह पडला जोरदार पाऊस

Rain Update : हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पश्चिम बंगालच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण किनारपट्टीवर शनिवारी (ता.25) वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. विशेषतः सिंधुदुर्ग आणि चिपळूण शहर व परिसरात सायंकाळच्या सुमारास हजेरी लावून पावसाने दाणादाण उडवून दिली. अचानक कोसळलेल्या पावसाने वीजपुरवठा खंडीत होऊन तेथील जनजीवन विस्कळीत झाले.

Heavy rains with thunderbolts fell in this area today

हवामान विभागाकडून कोकणासह मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भ, मराठवाड्यासाठी शनिवारी (ता.25) विजांच्या कडकडासह जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला होता. प्रत्यक्षात कोकण किनारपट्टीच्या भागातील चिपळूण शहर व परिसरात पाऊस पडल्याने हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला. रविवारी (ता.26) सुद्धा खान्देशातील धुळे व नंदुरबार तसेच लगतच्या नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर आदी काही जिल्ह्यात गारपिटीसह जोरदार पावसाचा अंदाज (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, पावसाळी वातावरण तयार झाल्याने वातावरणातील दमटपणा गेल्या दोन दिवसांपासून वाढला असून, थंडीचे प्रमाणही कमी झाले आहे. आताच्या घडीला पाऊस पडल्यास शिवारातील वेचणीवर आलेल्या कापसाचे मोठे नुकसान होऊ शकते. मात्र, रब्बीच्या पेरण्यांना या पावसाचा निश्चितच फायदा होऊ शकतो. विशेषकरून कोरडवाहू क्षेत्रावरील हरभरा तसेच दादर ज्वारीच्या पेरण्यांना व तुरीच्या पिकाला या पावसामुळे मोठे जीवदान मिळू शकते, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

WhatsApp Group
Previous articleBanana Rate : उद्या रविवारी (ता.26 नोव्हेंबर) असे असतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगावचे केळी भाव
Next articleWeather Update : सावधान, राज्याच्या या भागात आज गारपिटीसह मुसळधार पावसाचा इशारा