साहित्यिकांच्या ज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांच्या बळकटीकरणासाठी व्हावा – मंत्री अनिल पाटील

गावशिवार न्यूज | साहित्यिकांच्या ज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांच्या बळकटीकरणासाठी करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अमळनेर येथील ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रक तथा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी केले. साने गुरुजी साहित्यनगरीत साहित्य संमेलनाचे उद्घाटन लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते झाले. (Sahitya Sammelan)

साने गुरुजी साहित्यनगरीत अखिल भारतीय मराठी महामंडळाच्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घघाटन लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, भाषा-शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आदी उपस्थित होते. संमेलनाच्या आधी सकाळी वाडी संस्थानपासून ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला. ग्रंथदिंडीच्या पालखीत दासबोध, श्री ज्ञानेश्वरी, भारताचे संविधान, श्रीमद भगवतगीता, भारतीय संस्कृती या ग्रंथ गुरूंचा समावेश होता. संमेलनाच्या निमित्ताने राज्यभरातील अनेक साहित्यिकांसह रसिक अमळनेरात दाखल झाले आहेत.

मराठीला ज्ञानभाषा करण्याची जबाबदारी सरकार तसेच नागरिकांचीही आहे. मराठी साहित्य आणि भाषा टिकवण्यासाठी शासनाबरोबर वेगवेगळ्या समाजघटकांनीही प्रयत्न करावे, अशी गरज संमेलनाध्यक्ष रविंद्र शोभणे यांनी व्यक्त केली. राज्यसभा आणि विधानपरिषदेवर वेळोवेळी साहित्य, कला क्षेत्रातल्या मान्यवरांची वेळोवेळी नेमणूक करावी, अशी मागणी त्यांनी केली. साहित्यातून समाजात वागावे कसे याची शिकवणूक मिळते. तळागाळातल्या लोकांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी राजकारण, समाजकारण केलं जातं, असे उद्घाटक सुमित्रा महाजन यांनी सांगितले. साने गुरुजींच्या स्मारकाचा प्रस्ताव जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी तयार करावा. या प्रस्तावानुसार साने गुरुजींच्या स्मारकास येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

WhatsApp Group
Previous articleशनिवार (ता. 03 फेब्रुवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळी भाव
Next articleरविवार (ता. 04 फेब्रुवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळी भाव