Shiv Mahapuran Katha : शिव महापुराण कथा मुख्य सभा मंडप उभारणीचा जळगावमध्ये शुभारंभ

Shiv Mahapuran Katha : जळगाव जिल्ह्यातील वडनगरी फाट्यावर 5 ते 11 डिसेंबर दरम्यान बडे जटाधारी महादेव मंदिर समितीतर्फे पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याच्या मुख्य सभा मंडपाच्या उभारणी कामांचा शुभारंभ पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी पालकमंत्र्यांनी कार्यक्रमाच्या पूर्व तयारीचा आयोजक संस्था व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला.

Construction of Shiva Mahapuran Katha Main Sabha Mandap started in Jalgaon

जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता गिरीश सुर्यवंशी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, बडे जटाधारी महादेव मंदिर समितीचे जगदीश चौधरी, सीए हितेश‌ आगीवाल व पदाधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथा कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली. पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले की, शिव महापुराण कथेसाठी जळगाव जिल्ह्यात सुमारे 6 लाख भाविक येणार आहेत. यासाठी जिल्हा वासियांनी आयोजकांना‌ सहकार्य करावे. कार्यक्रमासाठी वाहतूक नियोजन काटेकोरपणे करण्यात यावे. सुसज्ज स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, भोजन, आंघोळीसाठी गरम पाणी याकडे आयोजकांनी लक्ष द्यावे. प्रशासनाकडून चोपडा-जळगाव रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावे तसेच साईड पट्ट्यांवर भराव टाकावा. मंदिर परिसरात रबरचे स्पीड ब्रेकर बसविण्यात यावे. पाळधी-आव्हाने रस्त्याचीही दुरूस्ती करण्यात यावी. महावितरणने कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वतंत्र ट्रान्सफार्मर तसेच पथदिवे बसवावे. स्वतंत्र आरोग्य पथक नेमावे. साफसफाईची चोख व्यवस्था ठेवावी. वाहतूकीचे चोख नियोजन करावे. महावितरण, आरोग्य, पोलीस व बांधकाम विभागाने एकमेकांशी समन्वय ठेवत काम करावे, अशा सूचना ही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

WhatsApp Group
Previous articleBanana Rate : उद्या शनिवारी (ता.25 नोव्हेंबर) असे असतील केळीचे भाव
Next articleJalgaon News : जळगाव जिल्ह्यात 45 जणांचे शस्त्र परवाने रद्द, गैरप्रकारांना बसणार आळा