शासन धरणांच्या भिंतीवर, जलाशयात तरंगते सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार

Solar Power Project : राज्यातील पाटबंधारे विभागाला आर्थिकदृष्ट्या स्वंयपूर्ण बनविण्यासाठी धरणांच्या भिंतीवर तसेच धरणात साठलेल्या जलाशयांमध्ये तरंगते सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा विचार शासनाकडून केला जात आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाला मोठा महसूल मिळणार असल्याने त्यासंदर्भात पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री यांनी दिले आहेत.

The government will set up solar power plants on the walls of dams, in reservoirs

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात विदर्भासह कृष्णा पाटबंधारे विकास महामंडळ, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितिन करीर, उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. त्यात बोलताना उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सौर ऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून पाटबंधारे विभागाला महसूल मिळवून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

राज्यातील वीजेची वाढती मागणी लक्षात घेता नवीन व नवीकरणीय (अपारंपारिक ऊर्जा) ऊर्जा स्त्रोतांचा विकास करणे काळाची गरज बनली आहे. सौर ऊर्जा स्त्रोतांचा पुरेपुर वापर करून राज्यात पारेषण विरहीत ऊर्जा निर्मिती प्रकल्प विकसित करणेही तितकेच गरजेचे झाले आहे. याअनुषंगाने महाराष्ट्र राज्याने उर्जा नवीकरणीय धोरण यापूर्वीच निश्चित केले आहे. त्यामाध्यमातून सिंचन प्रकल्पांच्या महाकाय भिंती तसेच धरणांमध्ये अडविण्यात आलेल्या जलाशयांवर तंरगत्या स्वरूपात सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करणे शक्य होणार आहे.

WhatsApp Group
Previous articleशनिवारी (ता. 30 डिसेंबर) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव
Next articleसातारा, नगर वगळता राज्यातील बहुतांश भागात किमान तापमानात वाढ