पुण्यात मालदांडी ज्वारीला 6000 रूपये प्रति क्विंटलपर्यंत मिळाला दर

गावशिवार न्यूज | राज्यात रब्बी हंगामातील ज्वारीच्या काढणीला नुकतीच सुरूवात झाली असून, नवा माल ठिकठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी दाखल होऊ लागला आहे. सध्या ज्वारीची दैनंदिन सरासरी 3 ते 4 हजार क्विंटलपर्यंतच आवक होत असून, पैकी मालदांडी व दादर प्रकारातील ज्वारीला बऱ्यापैकी दर देखील मिळताना दिसत आहे. गुरूवारी (ता. 08 फेब्रुवारी) पुण्यात मालदांडी ज्वारीला सर्वाधिक 6000 रूपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळाला. (Sorghum Rate)

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, गुरूवारी (ता. 08) पुण्यात मालदांडी ज्वारीची सुमारे 668 क्विंटल आवक झाली आणि तिला 5000 ते 6000, सरासरी 5500 रूपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. धुळे येथे दादर ज्वारीची फक्त 03 क्विंटल आवक झाली आणि तिला सरासरी 4450 रूपये प्रति क्विंटल दर मिळाला. बीडमध्ये मालदांडी ज्वारीची 35 क्विंटल आवक होऊन 2000 ते 3411, सरासरी 2674 रूपये प्रति क्विंटल दर मिळाला. जालन्यात मालदांडीची 15 क्विंटल होऊन 2050 ते 2900 रूपये, सरासरी 2100 प्रति क्विंटल दर मिळाला. नाशिकमध्ये दादर ज्वारीची फक्त 01 क्विंटल आवक झाली आणि तिला सरासरी 3500 रूपये प्रति क्विंटल दर मिळाला.

WhatsApp Group
Previous articleकापसाला गुजरातमध्ये ‘या’ ठिकाणी मिळाला 7370 रूपये प्रति क्विंटल दर
Next articleआपत्तीची पूर्वसूचना देणाऱ्या स्वत:च्या उपग्रहासाठी शासन प्रयत्नशील- आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. पाटील