खरीप हंगामातील सोयाबीनला 4800 रूपये प्रतिक्विंटल भाव, आवक सर्वसाधारण

जळगाव । राज्यात पावसाचा जोर कमी झाल्यानंतर खरीप हंगामातील सोयाबीन पिकाच्या काढणीला आता वेग आला आहे. तरीही विविध ठिकाणच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक सर्वसाधारणच असून, कमाल 4800 रूपये प्रतिक्विंटल भाव सोयाबीनला मिळाला आहे.

राज्यातील शेतकरी खरीप हंगामातील सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात घेत असतात. विशेषतः विदर्भ आणि खान्देशात सोयाबीनखालील क्षेत्र जास्तकरून असते. संबंधित सर्व शेतकऱ्यांचा सोयाबीन आता काढणीवर आला असून, ठिकठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये हळूहळू सोयाबीनची आवक वाढताना दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी (ता.3) लातूरमध्ये सर्वाधिक 9135 क्विंटल आवक झाली. त्याठिकाणी सोयाबीनला 4246 ते 4830 रुपये, सरासरी 4700 रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला. खालोखाल अमरावतीमध्ये 6351 क्विंटल आवक झाली. तिथे सोयाबीनला 4450 ते 4600 रुपये, सरासरी 4525 रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला. कारंजामध्येही 6000 क्विंटल आवक झाली, तिथे 4300 ते 4655 आणि सरासरी 4445 रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला. वाशिमध्ये 6000 क्विंटल आवक झाली, त्यास 4300 ते 4660 रूपये आणि सरासरी 4400 रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला. उदगीरमध्ये 3110 क्विंटल आवक झाली, तिथे 4700 ते 4752 रुपये आणि सरासरी 4726 रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला. माजलगावात 692 क्विंटल आवक झाली, त्यास 4300 ते 4612 रूपये आणि सरासरी 4500 रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मालेगाव (वाशिम) येथे 619 क्विंटल आवक झाली, त्यास 4100 ते 4650 रुपये आणि सरासरी 4250 रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला. हिंगोलीत 800 क्विंटल आवक झाली, त्यास 4405 ते 4640 रुपये आणि सरासरी 4522 रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मेहकरमध्ये 1270 क्विंटल आवक झाली, त्यास 4000 ते 4620 रुपये आणि सरासरी 4500 रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला. जालन्यात 2120 क्विंटल आवक झाली, त्यास 3700 ते 4700 आणि सरासरी 4600 रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला. अकोल्यात 1427 क्विंटल आवक झाली, त्यास 4000 ते 4755 रुपये आणि सरासरी 4600 रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला. जळगाव जिल्ह्यातील चोपड्यातही सोयाबीनची 400 क्विंटल आवक झाली. तिथे 4000 ते 4382 रूपये आणि सरासरी 4300 रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

WhatsApp Group
Previous articleयशोगाथा : अपंगत्वावर मात करुन शेळीपालनात यशस्वी ठरला लीलाधर
Next articleमुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घ्या, लाईट नसताना शेत भिजवा