Soyabean Market : राज्यात सोयाबीनला बहुतांश ठिकाणी आधारभूत किंमतीपेक्षा जास्त मिळतोय बाजारभाव

Soyabean Market : विविध कारणांनी उत्पादनात मोठी घट आल्याने राज्यात सोयाबीनला किरकोळ अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी सध्या आधारभूत किंमतीपेक्षा जास्त भाव मिळत असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये होणारी सोयाबीनची आवक आता थोडी कमी झाली असून, त्यामुळे सोयाबीनचे भाव थोडे तेजीतच आहेत.

The market price of soybeans in most places in the state is higher than the base price

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये एरव्ही दैनंदिन सरासरी सोयाबीनची दीड लाख क्विंटलपेक्षा जास्त आवक सुरु होती. त्यात आता सातत्य राहिलेले नसून, बहुतांश शेतकऱ्यांचा माल विकला गेलेला आहे. शुक्रवारी (ता.17 नोव्हेंबर) देखील राज्यभरात सोयाबीनची फक्त 37 हजार 268 क्विंटल आवक झाली होती. पैकी अमरावती येथील बाजार समितीत लोकल सोयाबीनची सर्वाधिक 9,942 क्विंटल आवक झाली. विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात आवक होऊनही अमरावतीत सोयाबीनला 5000 ते 5181 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. अकोला येथेही पिवळ्या सोयाबीनची 7,646 क्विंटल आवक झाली आणि त्यास 4750 ते 5223 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. वाशिम बाजार समितीतही सोयाबीनची 5000 क्विंटल आवक झाली, त्यास 4950 ते 5200 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. लातूरमध्ये 1772 क्विंटल आवक झाली, त्यास 5131 ते 5223 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. हिंगोलीत लोकल सोयाबीनची 930 क्विंटल आवक झाली, त्यास 4800 ते 5230 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला आणि पिवळ्या सोयाबीनची 471 क्विंटल आवक होऊन 5000 ते 5150 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. बुलडाण्यात 2250 क्विंटल आवक झाली, त्यास 4808 ते 5316 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. नाशिकमध्ये सोयाबीनची 268 क्विंटल आवक झाली, त्यास 4800 ते 5201 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. परभणीत सोयाबीनची 108 क्विंटल आवक झाली, त्यास 4951 ते 5051 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.

नागपूर, नांदेडमध्ये मात्र सोयाबीनचे भाव कमी

केंद्र सरकारने सोयाबीनसाठी 4600 रुपये प्रतिक्विंटलचे किमान आधारभूत मूल्य निश्चित केले आहे. प्रत्यक्षात बहुतांश बाजार समित्यांमध्ये आधारभूत किंमतीपेक्षा जास्त भाव सोयाबीनला सध्या मिळत असला तरी काही ठिकाणी किमान आधारभूत किमतींपेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत. त्यात नागपूर आणि नांदेड बाजार समित्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. शुक्रवारी (ता.17) देखील नागपूरमध्ये सोयाबीनला 4200 रूपयांपासून भाव मिळाले तसेच नांदेड येथे सोयाबीनला 4450 रूपयांचा किमान भाव शेतकऱ्यांना मिळाला.

WhatsApp Group
Previous articleIndian Railways : इगतपुरी-भुसावळ-बडनेरा सेक्शनमध्ये 12 रेल्वे गाड्यांचा वेग आता 130 किलोमीटर प्रतितास
Next articleBanana Rate : उद्या शनिवारी (ता.18 नोव्हेंबर) असे असतील केळीचे भाव