Soyabean Market Rate: राज्यात सोयाबीनची आवक वाढली, ‘या’ ठिकाणी मिळाला सर्वाधिक भाव

Soyabean Market Rate: राज्यातील ठिकठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनची आवक वाढली आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात सोयाबीनची आवक जास्त असून, संबंधित शेतकऱ्यांना 5,000 रूपये प्रतिक्विंटलच्या आतच भाव मिळाला आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, रविवारी (05 नोव्हेंबर) बहुतांश ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समित्यांना सुटी असल्याने बुलडाणा आणि छत्रपती संभाजीनगर वगळता कुठेच सोयाबीनच्या आवकेची व खरेदी-विक्रीची नोंद घेण्यात आली नव्हती. रविवारी दोन्ही बाजार समिती मिळून 1,112 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. पैकी बुलडाण्यात सोयाबीनची सुमारे 1,000 क्विंटल आवक झाली, त्यास 3800 ते 4850 रूपये, सरासरी 4200 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. छत्रपती संभाजीनगरात सोयाबीनची 112 क्विंटल आवक झाली, त्यास 4700 ते 4851 रुपये, सरासरी 4800 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.

Soyabean Market Rate in Maharashtra Apmc

शनिवारी (04नोव्हेंबर) राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची सुमारे 1 लाख 88 हजार 937 क्विंटल आवक झाली होती. पैकी अकोल्यात 10,138 क्विंटल सोयाबीनची आवक झाली, त्यास 4360 ते 4823 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. अमरावतीमध्ये स्थानिक सोयाबीनची 15,504 क्विंटल आवक झाली, त्यास 4650 ते 4791 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला, याशिवाय पिवळ्या सोयाबीनची 13,131 क्विंटल आवक झाली, त्यास 4125 ते 4931 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. बुलडाण्यात पिवळ्या सोयाबीनची 25,523 क्विंटल आवक झाली, त्यास 4233 ते 4889 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. छत्रपती संभाजीनगरात सोयाबीनची 565 क्विंटल आवक झाली, त्यास 4363 ते 4757 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. धाराशिवमध्ये सोयाबीनची 1675 क्विंटल आवक झाली, त्यास सरासरी 4650 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. हिंगोलीत लोकल सोयाबीनची 3415 क्विंटल आवक झाली, त्यास 4570 ते 4895 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. जळगावमध्ये 1759 क्विंटल आवक झाली, त्यास 4305 ते 4796 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. जालन्यात 15,144 क्विंटल सोयाबीनची आवक झाली, त्यास 4330 ते 4935 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. लातूरमध्ये पिवळ्या सोयाबीनची 47,724 क्विंटल आवक झाली, त्यास 4379 ते 4817 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. नांदेडमध्ये 6461 क्विंटल आवक झाली, त्यास 4475 ते 4765 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. नंदुरबारमध्ये 403 क्विंटल आवक झाली, त्यास 4301 ते 4840 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. सोलापुरात सोयाबीनची 35,226 क्विंटल आवक झाली, त्यास 4320 ते 4675 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. वाशिमला 21,497 क्विंटल आवक झाली, त्यास 4540 ते 4931 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. यवतमाळला 11350 क्विंटल आवक झाली, त्यास 4355 ते 4863 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.

WhatsApp Group
Previous articleCotton Market Rate: महाराष्ट्रातील ‘या’ बाजार समित्यांमध्ये कापसाला मिळाला आहे ‘इतका’ भाव
Next articleOnion Market Rate: राज्यात कांद्याची आवक घटली, सध्या बाजारात मिळतोय ‘असा’ भाव