Soyabean Market Rate: महाराष्ट्रात सोयाबीनला ‘या’ मार्केटमध्ये मिळाला 5,151 रूपये प्रतिक्विंटलचा भाव

Soyabean Market Rate: महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये होणारी आवक कमी झाल्यानंतर सोयाबीनच्या भावात आता थोडी सुधारणा झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, हिंगोली येथील बाजार समितीत बुधवारी (ता. 08 नोव्हेंबर) लोकल सोयाबीनला सर्वाधिक 4700 ते 5151 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.

The highest price of soybeans in Maharashtra was Rs 5,151 per quintal

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, बुधवारी (ता.08) राज्यभरातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची सुमारे 33 हजार 639 क्विंटल आवक झाली. हंगामाचा विचार करता सोयाबीनची आता होत असलेली आवक ही 25 टक्केही नाही. त्यामुळेच सोयाबीनचे भाव काहीअंशी सुधारले आहेत. राज्यातील अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी सोयाबीनची 13,665 क्विंटल आवक झाली, त्यास 4750 ते 4861 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. खालोखाल वाशिम येथील बाजार समितीत लोकल सोयाबीनची 9500 क्विंटल आवक झाली, त्यास 4450 ते 4950 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. तसेच पिवळ्या सोयाबीनची 3300 क्विंटल आवक झाली, त्यास 4513 ते 4855 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. हिंगोलीत लोकल सोयाबीनची 2330 क्विंटल आवक झाली, त्यास 4700 ते 5151 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. हिंगोलीतच पिवळ्या सोयाबीनची 701 क्विंटल आवक झाली, त्यास 4600 ते 4800 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. नगरमध्ये लोकल सोयाबीनची 146 क्विंटल आवक झाली, त्यास 4600 ते 4850 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. अकोल्यात पिवळ्या सोयाबीनची 275 क्विंटल आवक झाली, त्यास 4700 ते 4900 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. बीडमध्ये सोयाबीनची 416 क्विंटल आवक झाली, त्यास 4360 ते 4855 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.

छत्रपती संभाजीनगरात पिवळ्या सोयाबीनची फक्त 10 क्विंटल आवक झाली, त्यास 4593 ते 4776 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. धाराशिवमध्ये 465 क्विंटल आवक झाली, त्यास 4700 ते 4778 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. जळगाव बाजार समितीत पिवळ्या सोयाबीनची 26 क्विंटल आवक झाली, त्यास 4485 ते 4855 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. जालन्यात पिवळ्या सोयाबीनची 189 क्विंटल आवक झाली, त्यास 4650 ते 4900 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. तर लोकल सोयाबीनची 100 क्विंटल आवक झाली, त्यास 4051 ते 4900 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. लातूरमध्येही सोयाबनची 1320 क्विंटल आवक झाली, त्यास 4851 ते 5071 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. नाशिकमध्ये सोयाबीनची 111 क्विंटल आवक झाली, त्यास 440 ते 4910 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. याशिवाय सोलापुरात 107 क्विंटल आवक झाली, त्यास 4670 ते 4892 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.

WhatsApp Group
Previous articleCotton Rate In Gujrat: गुजरात राज्यात कापसाला कोणत्या बाजारात मिळतोय 8,080/- रूपये प्रतिक्विंटलचा भाव ?
Next articleSuccess Story: कलिंगडाच्या वाया गेलेल्या पिकात जादुची कांडी फिरली….शेतकरी 65 दिवसातच बनला ‘लखपती’