दुधात काय ठेवलंय, खवा विकून कोट्याधीश झाला हा तरूण

गावशिवार न्यूज | जळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकरी शेतीला पूरक दुग्धव्यवसाय करतात. अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथील अनिल अशोक पाटील हा तरूण मात्र दुधावर प्रक्रिया करून आज एक यशस्वी उद्योजक बनला आहे. त्याच्या ग्रामीण भागातील खवा उद्योगाची माहिती आज आपण यशोगाथा सदरात घेणार आहोत. (Success Story)

आयटीआयचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनिलला शासकीय नोकरी सुद्धा मिळाली होती. मात्र, वडिलांच्या आग्रहाखातर त्याने घरगुती खवा उद्योगात करियर करण्याचा निर्णय घेतला. सन 1964 मध्ये आजोबांनी सुरू केलेल्या खवा उद्योगात आता अनिल पाटील यांची तिसरी पिढी कार्यरत आहे. त्यांचे आजोबा त्याकाळी सरपण वापरून चुलीवर दूध आटवायचे, पारंपरिक पद्धतीनेच खवा उद्योग चालविला जात असे. वडिल अशोक चैत्राम पाटील यांनी 1984 मध्ये खवा उद्योगाची सूत्र घेतली आणि जळगावसह धुळे व नंदुरबार जिल्ह्यात नवीन ग्राहक जोडले. कालांतराने वाफेवर चालणारी भट्टी वापरून खवा बनविण्यावर भर दिला. अनिल पाटील यांनी वडिलांच्या पश्चात या व्यवसायात आणखी मोठी भरारी घेतली आहे. कष्टाच्या पैशांवर सुमारे 20 एकर शेती देखील घेतली आहे.
(सविस्तर यशोगाथा जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ अवश्य पाहा)

WhatsApp Group
Previous articleप्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा, जैन इरिगेशनतर्फे चौकांसह उद्यानांमध्ये सजावट व रोषणाई
Next articleसोमवारी (22 जानेवारी) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगावचे केळी भाव