शेळ्यांपेक्षा बोकडपालन फायदेशीर…तरूण दरवर्षी कसा कमावतो 50 लाख ?

गावशिवार न्यूज | जळगाव जिल्ह्यातील वनकोठे (ता.एरंडोल) येथील तरूण हेमंत नाना पाटील यांच्या शेळीपालन व्यवसायाच्या यशोगाथेची माहिती आज आपण घेणार आहोत. उच्च शिक्षण घेतल्यानंतर नाशिक येथील के. के. वाघ कृषी महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी करणारे हेमंत पाटील यांना सुरूवातीपासूनच शेळीपालनाची आवड होती. घरच्या गावरान शेळ्यांचे संगोपन करीत असताना, एक दिवस त्यांना बोकडपालनाची माहिती मिळाली. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केल्यावर गावरान बोकडांपासून फार काही फायदा राहत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी व्यावसायिक दृष्टीकोनातून राजस्थानमधून सिरोही, अजमेरी, सोजत जातीचे बोकड विकत आणून वनकोठे येथील शेडमध्ये वाढविण्यावर भर दिला. साधारणतः आठ ते दहा महिने वयाचे बोकड विकत आणून त्यांना चांगली खुराक देऊन बकरी ईदच्या तोंडावर ते विकतात. अशाप्रकारे बोकडपालन केल्याने त्यांना दरवर्षी सुमारे 50 लाखांची कमाई होते. खर्च वजा जाऊन तब्बल 25 ते 30 लाखांचा नफा देखील मिळतो. (Success Story)
सविस्तर माहितीसाठी कृपया खालील व्हिडीओ अवश्य पाहा

WhatsApp Group
Previous articleउत्तर महाराष्ट्रासह विदर्भात किमान तापमानात झाली दोन ते तीन अंशाने घट
Next articleकांदा, साखर, तांदूळ, गव्हावरील निर्यातबंदी उठण्याची शक्यता नाहीच