महाराष्ट्रातील साखर उत्पादन ‘या’ कारणाने घटण्याची शक्यता

Sugar Production in Maharashtra : खासगी व सहकारी साखर कारखान्यांकडून ऊस गाळपाला गती मिळाल्यापासून देशातील साखर उत्पादनात चांगली वाढ झाली आहे. नोव्हेंबरअखेर सुमारे 172 लाख टन उसाचे गाळप आणि 13.50 टन साखरेचे उत्पादन घेऊन महाराष्ट्र सध्या अव्वल असला, तरी अवकाळी पावसाने ऊस तोडणीत व गाळपात व्यत्यय आणल्याने आगामी काळात महाराष्ट्रातील साखरेच्या उत्पादनावर विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Sugar production in Maharashtra is likely to decrease due to ‘this’ reason

देशातील साखर कारखान्यांकडून घेतल्या जाणाऱ्या साखरेच्या एकूण उत्पादनात उत्तरप्रदेश तसेच महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांमधील साखर उत्पादनाचा मोठा वाटा दरवर्षी असतो. यंदाही नोव्हेंबरअखेर महाराष्ट्राने 13.50 लाख टन साखरेचे उत्पादन घेऊन अव्वल क्रमांक पटकावला आहे. याशिवाय उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांनी 13 लाख टन साखरेचे उत्पादन घेऊन दुसरा क्रमांक पटकावला आहे, तर कर्नाटक राज्याने 11 लाख टनाचे साखर उत्पादन घेऊन तिसरा क्रमांक पटकावला आहे. प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्राने नोव्हेंबरअखेर 172 लाख टन उसाचे गाळप करून आघाडी घेतली असली तरी, राज्यात साखरेचा सरासरी उतारा 7.85 टक्के इतकाच मिळाला आहे. उत्तर प्रदेशने 144 लाख टन उसाचे गाळप केले असून, साखरेचा सरासरी उतारा 9.05 टक्के इतका मिळाला आहे. साखर उत्पादनासाठी आवश्यक पुरेशा वातावरणामुळे महाराष्ट्रापेक्षा जास्त साखरेचा उतारा उत्तर प्रदेशाने घेऊन दाखवला आहे. कर्नाटक राज्यानेही 130 लाख टन उसाचे गाळप केले असून, साखरेचा सरासरी उतारा 8.50 टक्के घेतला आहे. महाराष्ट्रात उत्तर प्रदेश तसेच कर्नाटकाच्या तुलनेत साखरेचा उतारा कमी असला तरी आगामी काळात थंडीचे प्रमाण वाढल्यानंतर त्यात थोडीफार वाढ होऊ शकते, असे जाणकारांकडून सांगितले जात आहे.

महाराष्ट्रात यामुळे साखरेचा उतारा कमी

ऊस उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या पट्ट्ट्यातील शेतकरी संघटनेची आंदोलने आणि अवकाळी पावसाची हजेरी यामुळे आधीच महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचे गाळप रखडले आहे. त्यात सततच्या आभ्राच्छादित वातावरणामुळे थंडी गायब झाल्याने महाराष्ट्रातील साखरेच्या उताऱ्यावर पर्यायाने उत्पादनावर विपरित परिणाम झाल्याचे बोलले जाते आहे. प्रतिकूल वातावरण कायम राहिल्यास आगामी काळात महाराष्ट्राला उत्तर प्रदेश व कर्नाटक ही राज्ये ऊस गाळपासह साखरेच्या उत्पादनात मागे टाकल्याशिवाय राहणार नाहीत.

WhatsApp Group
Previous articleदक्षिण भारतात मिचौंग चक्रीवादळाचे थैमान; महाराष्ट्रातही वाढली चिंता
Next articleमाता, पिता अन् गुरू हेच तुमच्या आयुष्याचे खरे ब्रेक : पंडित प्रदिप मिश्रा