जळगावमध्ये टोमॅटोला सर्वाधिक 18 रुपये प्रतिकिलोचा दर

जळगाव । गावशिवार न्यूज । काही दिवसांपूर्वी मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने टोमॅटोचे दर सुमारे 150 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडाचे पाणी सुद्धा पळाले होते. आताही आवक जेमतेम असली तरी टोमॅटोचे दर सामान्यच आहेत. प्राप्त माहितीनुसार जळगावात टोमॅटोला सर्वाधिक 18 रुपये किलोचे दर मिळाले आहेत. तुलनेत अन्य बाजार समितीत टोमॅटोचे दर 400 ते 750 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नगरमध्ये टोमॅटोची फक्त 101 क्विंटल आवक होती आणि दर 300 ते 500 रुपये, सरासरी 400 रुपये प्रतिक्विंटल होते. जळगावमध्ये जेमतेम 32 क्विंटल आवक होती आणि दर 1500 ते 2000 रुपये, सरासरी 1800 रुपये प्रतिक्विंटल होते. कोल्हापुरात 238 क्विंटल आवक होती आणि दर 400 ते 1100 रुपये, सरासरी 800 रुपये प्रतिक्विंटल होते. पुण्यात 961 क्विंटल आवक होती आणि दर 400 ते 733 रुपये, सरासरी 600 रुपये प्रतिक्विंटल होते. पुण्यातील लोकल मार्केटमध्ये 2836 क्विंटल आवक होती आणि दर 475 ते 825 रुपये, सरासरी 650 रुपये प्रतिक्विंटल होते. सातारा येथे टोमॅटोची 100 क्विंटल आवक होती आणि दर 500 ते 1000 रुपये, सरासरी 750 रुपये प्रतिक्विंटल होते. सोलापुरात फक्त 59 क्विंटल आवक होती आणि दर 200 ते 1000 रुपये, सरासरी 400 रुपये प्रतिक्विंटल होते. सोमवारी विशेषतः पुण्यात टोमॅटोची जेमतेम 22 क्विंटल आवक झाली होती, त्यास 700 ते 1000 रुपये, सरासरी 850 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

WhatsApp Group
Next articleपुण्यात नवीन उडदाला सर्वाधिक 9850 रुपये प्रतिक्विंटलचा बाजारभाव