हिंगोलीत तुरीला मिळाला सर्वाधिक 10,999 रूपये प्रति क्विंटलचा भाव

गावशिवार न्यूज | राज्यातील विविध ठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सध्या तुरीची आवक वाढली असून, मागणी कायम असल्याने तुरीचे भाव देखील तेजीत आहेत. शुक्रवारी (ता. 02 फेब्रुवारी) राज्यभरात सुमारे 28 हजार 600 क्विंटल तुरीची आवक झाली. पैकी हिंगोली येथील बाजार समितीत तुरीला सर्वाधिक 10,999 रूपये क्विंटलचा भाव मिळाला. (Tur Market)

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी (ता. 02) हिंगोलीत तुरीची 550 क्विंटल आवक झाली होऊन 9900 ते 10999, सरासरी 10449 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कारंजामध्ये तुरीची 3500 क्विंटल आवक होऊन 9000 ते 10595 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. अकोल्यात तुरीची 2203 क्विंटल आवक होऊन 8000 ते 10570 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. अमरावतीमध्ये तुरीची 5850 क्विंटल आवक होऊन 9000 ते 10500 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. यवतमाळमध्ये तुरीची 844 क्विंटल आवक होऊन 8800 ते 10145 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. चोपड्यात तुरीची 350 क्विंटल आवक होऊन 9125 ते 10300 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. नागपूरमध्ये तुरीची 5808 क्विंटल आवक होऊन 8500 ते 10261 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. वाशीममध्ये तुरीची 2100 क्विंटल आवक होऊन 9150 ते 10500 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. मुर्तिजापूरमध्ये तुरीची 1400 क्विंटल आवक होऊन 9005 ते 10415 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. मेहकरमध्ये 1170 क्विंटल आवक होऊन 8500 ते 10000 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. छत्रपती संभाजीनगरात 133 क्विंटल आवक होऊन 9401 ते 10311 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. बुलडाण्यात तुरीची 200 क्विंटल आवक होऊन 9000 ते 9800 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. गेवराईत 297 क्विंटल आवक होऊन 9600 ते 10500 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. तुळजापुरात तुरीची 42 क्विंटल आवक होऊन 10000 ते 10575 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला.

WhatsApp Group
Previous articleतापी नदीवरील पाडळसरे प्रकल्पातून जूनपर्यंत पाणी अडविण्याचे नियोजन
Next articleशनिवार (ता. 03 फेब्रुवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळी भाव