गावशिवार न्यूज | राज्यातील ठिकठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये नवीन हंगामातील तुरीची आवक आता वाढली आहे. मात्र, मागणी चांगली असल्याने तुरीचे भाव देखील तेजीत आहेत. दरम्यान, शनिवारी (ता. 20 जानेवारी) हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला सर्वाधिक 10,295 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. (Tur Market Rate)
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, राज्यात शनिवारी 22 हजार क्विंटलपेक्षा जास्त तुरीची आवक झाली होती. पैकी हिंगोलीत तुरीची 250 क्विंटल आवक होऊन 9650 ते 10295, सरासरी 9972 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. अकोल्यात तुरीची 1855 क्विंटल आवक होऊन 7400 ते 10285, सरासरी 9000 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. नागपूरमध्ये 2280 क्विंटल आवक होऊन 8500 ते 10211, सरासरी 9783 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. मुर्तिजापूरमध्ये 60 क्विंटल आवक होऊन 8850 ते 10005, सरासरी 9405 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. मलकापूरमध्ये तुरीची 2150 क्विंटल आवक होऊन 8815 ते 10170, सरासरी 9510 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. जालन्यात 4593 क्विंटल आवक होऊन 7701 ते 10201, सरासरी 9750 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. बीडमध्ये तुरीची 102 क्विंटल आवक होऊन 7010 ते 10100 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. तुळजापुरमध्ये तुरीची 42 क्विंटल आवक होऊन 9000 ते 9700 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. हिंगणघाटमध्ये 2079 क्विंटल आवक होऊन 8000 ते 9865 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. चिखलीत 500 क्विंटल आवक होऊन 7600 ते 9800 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. लातुरमध्ये तुरीची 6504 क्विंटल आवक होऊन 9601 ते 10100 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. सोलापुरात 254 क्विंटल आवक होऊन 8460 ते 9850 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. अमरावतीत 909 क्विंटल आवक होऊन 8000 ते 9511 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. रिसोडमध्ये 765 क्विंटल आवक होऊन 9065 ते 9600 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. अक्कलकोटमध्ये 1557 क्विंटल आवक होऊन 9250 ते 9901 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)