गव्हाच्या ‘या’ वाणाला पुण्यात कमाल 5200 रूपये प्रति क्विंटल मिळाला दर

Weat Rate : शेतकऱ्यांनी गहू काढणीला वेग दिल्यानंतर राज्यातील बहुतांश सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आता नव्या गव्हाची आवक सुरू झाली आहे. अपवाद वगळता बऱ्याच ठिकाणी गव्हाला बऱ्यापैकी दर सुद्धा मिळताना दिसत आहे. दरम्यान, पुणे येथे गव्हाच्या शरबती वाणाला मंगळवारी (ता. 20 फेब्रुवारी) कमाल 5200 रूपये प्रति क्विंटल दर मिळाला.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी (ता. 20) दुपारी साडेतीन वाजेपर्यंत राज्यभरात गव्हाची सुमारे 9340 क्विंटल आवक झाली होती. पैकी पुणे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शरबती वाणाची सुमारे 424 क्विंटल आवक झाली. त्यास 4600 ते 5200 आणि सरासरी 4900 रूपये प्रति क्विंटल दर मिळाला. नागपुरमध्येही शरबती गव्हाची 174 क्विंटल आवक झाली, त्यास 3100 ते 3500 रूपये प्रति क्विंटल दर मिळाला. नगरमध्ये 2189 वाणाची 139 क्विंटल आवक झाली, त्यास 2350 ते 2600 रूपये प्रति क्विंटल दर मिळाला. बुलडाण्यात लोकल गव्हाची 37 क्विंटल आवक झाली, त्यास 2250 ते 2900 रूपये प्रति क्विंटल दर मिळाला. छत्रपती संभाजीनगरात लोकल गव्हाची 87 क्विंटल आवक झाली, त्यास 2300 ते 3251 रूपये प्रति क्विंटल दर मिळाला. जळगावमध्ये लोकल गव्हाची 220 क्विंटल आवक झाली, त्यास 2416 ते 2798 रूपये प्रति क्विंटल दर मिळाला. जळगावमध्येच 147 गव्हाची 48 क्विंटल आवक झाली, त्यास 2600 ते 2750 रूपये प्रति क्विंटल दर मिळाला. नाशिकमध्ये लोकल गव्हाची 200 क्विंटल आवक झाली, त्यास 2653 ते 2912 रूपये प्रति क्विंटल दर मिळाला. ठाण्यात लोकल गव्हाची 640 क्विंटल आवक झाली, त्यास 3400 ते 3800 रूपये प्रति क्विंटल दर मिळाला.

WhatsApp Group
Previous articleनिर्यातबंदी हटविताच लासलगावमध्ये कांद्याच्या दरात 500 रूपयांची झाली वाढ
Next articleबुधवार (ता. 21 फेब्रुवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव